शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

कॅसिनो आग्वादला हलविण्यास कळंगुट, साळगांवमधील स्थानिकांचा तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 15:02 IST

मांडवी नदीतील कॅसिनो आग्वाद येथे हलवण्यास कळंगुट आणि साळगाव मतदारसंघातील लोकांनी जोरदार विरोध केला आहे.

पणजी: मांडवी नदीतील कॅसिनो आग्वाद येथे हलवण्यास कळंगुट आणि साळगाव मतदारसंघातील लोकांनी जोरदार विरोध केला आहे. कळंगुट मतदारसंघ फोरम व पिळर्ण नागरिक नागरिक समिती या प्रश्नावर एकत्र आली असून स्थानिक आमदार तथा बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांना इशारा देत या प्रश्नावर प्रसंगी रस्त्यावर येऊ, असे ठणकावून सांगितले आहे.

पत्रकार परिषदेत कळंगुट मतदारसंघ फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर यांनी लोबो हे पर्यटनाच्या नावाखाली कॅसिनोना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. कॅसिनोंमुळे ड्रग्स, वेश्याव्यवसाय आणखी फोफावेल, कळंगुटमध्ये पर्यटन हंगामात आधीच वाहतुकीची मोठी कोंडी होते त्यात आणखी भर पडेल तसेच अन्य अनेक प्रश्न उद्भवतील असे दिवकर म्हणाले. तसेच कॉंग्रेस सरकारच्या काळात मांडवीत तीन कॅसिनो आले परंतु त्यानंतर भाजप सरकारने आणखी चार आणले आणि आता मांडवीतील त्यांची संख्या सात बनली असल्याचे देखील दिवाकर यांनी स्पष्ट केले आहे.

कॅसिनो हे उत्पन्नाचे साधन असे सरकारला वाटत असेल तर सरकारने हे स्पष्ट करावे लागेल की, कॅसिनोपासून आजवर मिळालेला महसूल कुठे गेला? हा पैसा सरकारी तिजोरीत गेला की आमदारांच्या खिशात?  गेल्या दहा वर्षांच्या बाबतीत सरकारने जनतेसाठी हे स्पष्ट करावे लागेल असे देखील सांगण्यात आले.

पिळर्ण सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रकाश बांदोडकर म्हणाले की, लोबो यांनी लोकांना मूर्ख बनवणे चालू केले आहे. सागवान येथे कॅसिनो हलवल्यानंतर त्याचा फायदा कुणाला होणार हे आधी त्यांनी स्पष्ट करावे. भाजप सरकारने आता कॅसिनोना प्रोत्साहन देणे सुरू केले आहे. याच भाजपने विरोधात असताना पणजीत मशाल मिरवणुका काढल्या आणि कसिनोंना विरोध केला होता. कॅसिनोंच्या कार्यालयावर भाजपने धडक दिली होती, आणि राज्यात कुठेही कसिनो खपून घेणार नाही असे त्यावेळी ठणकावून सांगितले होते. या भूमिकेत आताच कसा काय बदल झाला?, असा सवाल बांदोडकर यांनी केला. ते  म्हणाले की लोबो या विषयावर लोकांची फसवणूक करत आहेत.

कॅसिनो आग्वादला न्यायचे नसतील तर इन्स्पेक्शन कशा करता केले हे जनतेला कळायला हवे. तिथे कॅसिनो आल्यास नेरूलची मिठागरे दूषित होतील. मत्स्य संपत्ती नष्ट होईल. या भागातील मच्छिमार 'तिसऱ्यो', 'कालवां' आदी शिंपले काढून उदरनिर्वाह करतात. शिंपले नष्ट होतील  सिकरी ते बागा पट्टा आधीच वर्दळीचा बनलेला आहे. वाहतूक कोंडी येथील नित्याचाच प्रकार बनला आहे. मायकल लोबो हे दोन वर्षांपूर्वी कसीनोंना विरोध करत होते. आताच त्यांची भूमिका बदलली कशी? असा सवाल बांदोडकर यांनी केला. पत्रकार परिषदेला कळंगुट, साळगांवमधील अन्य काही नागरिकही उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत