शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

थोडी कर्जमाफी शक्य

By admin | Updated: June 29, 2014 02:02 IST

पणजी : राज्यात खाणबंदी लागू झाल्यानंतर खनिज व्यवसायावर अवलंबून असलेल्या घटकांच्या डोक्यावर एक हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. यापैकी थोडे

पणजी : राज्यात खाणबंदी लागू झाल्यानंतर खनिज व्यवसायावर अवलंबून असलेल्या घटकांच्या डोक्यावर एक हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. यापैकी थोडे कर्ज माफ केले जावे म्हणून आवश्यक प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही वित्तीय संस्थांशी शनिवारी बैठक घेतली. राष्ट्रीयकृत बँका, सहकारी संस्था आणि पतपुरवठा संस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीत भाग घेतला. खाणग्रस्त भागातील आमदार नीलेश काब्राल, सुभाष फळदेसाई, डॉ. प्रमोद सावंत या वेळी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले की, कर्जे आणि व्याजाची रक्कम मिळून आता एकूण आकडा एक हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. सविस्तर तपशील तयार करून वित्तीय संस्थांना आपण पुन्हा बोलावले आहे. किती प्रमाणात कर्ज माफ करणे शक्य आहे ते आम्हाला आकड्यांसह सांगा, असे आपण वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. बँका जर एकरकमी कर्जफेड देत असेल तर राज्य सरकार खाण अवलंबितांना मदत करू शकते. ओटीएसच्या लाभासाठी आवश्यक रक्कम बँकांमध्ये जमा करण्यासाठी राज्य सरकार लोकांना मदत करू शकेल. काही कर्जदारांवरील कर्जाचा बोजा दुसऱ्या वित्तीय संस्थांकडे हस्तांतरित करता येईल. मूळ रकमेच्या भरण्यासाठी ज्या संस्था सॉफ्ट लोन देऊ शकतील, अशा संस्थांकडे काही कर्जे हस्तांतरित करता येतील. अशा संस्थांना कर्जफेडीच्या रकमेची हमी राज्य सरकार देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्जांचा डोंगर कमी करण्यासाठी सरकार एखादी आर्थिक योजना तयार करील. येत्या सप्टेंबरपर्यंत कर्जाचा विषय निकालात काढला जाईल, असेही ते म्हणाले. विविध वित्तीय संस्थांकडे किती कर्जे थकली आहेत, याची अचूक आकडेवारी मिळाल्यानंतरच सरकार योजना निश्चित करू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीयीकृत बँकांकडे ४५० कोटी, सहकारी बँकांकडे ३५० कोटी आणि अन्य वित्तीय संस्थांकडे ३०० कोटी रुपये थकलेले आहेत, सूत्रांकडून कळते. (खास प्रतिनिधी)