शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नावेलीतून विदेशी चलन लंपास

By admin | Updated: July 8, 2014 01:19 IST

मडगाव : नावेलीत चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. रविवारी मध्यरात्री अज्ञाताने एका बंगल्यात चोरी करून विदेशी चलन लंपास केले. चोरीला गेलेल्या चलनाची भारतीय चलनात एकूण ४ लाख ८८ हजार अशी किंमत आहे.

मडगाव : नावेलीत चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. रविवारी मध्यरात्री अज्ञाताने एका बंगल्यात चोरी करून विदेशी चलन लंपास केले. चोरीला गेलेल्या चलनाची भारतीय चलनात एकूण ४ लाख ८८ हजार अशी किंमत आहे. या चोरी प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. गेल्या पंधरवड्यातील नावेली भागातील ही चौथी चोरी आहे. एकाही प्रकरणाचा छडा पोलीस लावू शकलेले नाहीत. वाढत्या चोऱ्यांचा धसका नागरिकांनी घेतला असून, या भागात सध्या भीतीचे वातावरण आहे. नावेली येथील क्रुझनगर या भागात रविवारी चोरट्याने रॉडनी डिमेलो यांच्या बंगल्याला लक्ष्य करून आतील रोकड लंपास केली. डिमेलो हे विदेशात जहाजावर कामाला असून, २९ जून रोजी ते गोव्यात आले होते. रात्री ते आपल्या कुटुंबीयांसमवेत झोपले असताना चोरट्याने बाल्कनीचे दार तोडून आत शिरून ही चोरी केली. बेडरुमधील ड्रॉवर फोडून ७ हजार ६०० डॉलर्स व ४० युरो लंपास केले. मध्यरात्री डिमेलो यांना जाग आली तेव्हा त्यांना घरात एक अनोळखी व्यक्ती वावरत असल्याचे दिसून आले होते. काळ्या रंगाचा कुरळ्या केसांचा तसेच साधारणत: पाच फूट सहा इंच उंचीचा हा इसम होता. मात्र, स्वप्न पडले असावे, असे समजून ते पुन्हा झोपी गेले. नंतर सकाळी त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचे आढळून आल्यानंतर यासंबंधी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चोरीच्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, त्यातून पोलिसांच्या हाती फारसे काही गवसले नाही. भादंसंच्या ४५७ व ३८० कलमांखाली पोलिसांनी चोरीची ही घटना नोंदवून घेतली आहे. उपनिरीक्षक गिरेंद्र नाईक तपास करत आहेत. या भागात झालेल्या चोरी प्रकरणांत चोरट्यांची चोरीची पद्धत एकसारखीच असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. चोरी प्रकरणाचा तपास चालू असल्याची माहिती उपअधीक्षक मोहन नाईक यांनी दिली. (प्र्रतिनिधी)