शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लिंगपिसाट फ्रेडीच्या साथीदाराला आणणे अशक्य

By admin | Updated: June 10, 2014 01:49 IST

सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव गोव्यात अनाथाश्रम स्थापून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या

सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव गोव्यात अनाथाश्रम स्थापून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या लिंगपिसाट फ्रेडी पिट्स याचा ब्रिटिश साथीदार रेमंड वार्ली याच्यावर खटला चालविण्यासाठी त्याला गोव्यात आणण्याच्या सीबीआयच्या प्रयत्नाला खिळ बसली आहे. हा संशयित ‘डिमेन्शियल’ने त्रस्त असल्यामुळे त्याला खटल्याच्या सुनावणीसाठी गोव्यात पाठविणे त्याच्यासाठी त्रासदायक ठरेल, असे ब्रिटिश न्यायालयाने स्पष्ट केल्याने त्याच्यावर कारवाई होणे कठीण आहे. व्यवसायाने शिक्षक असलेला व सध्या हेलफिक्स येथे राहाणाऱ्या या संशयिताने १९८0च्या दरम्यान मडगावातील फ्रेडी पिट्सच्या आश्रमाला भेट देऊन तेथील मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. खटल्यासाठी त्याचे प्रत्यार्पण भारतात करावे, यासाठी सीबीआयने ब्रिटिश न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, संशयिताची प्रकृती त्याला भारतात पाठविण्याइतपत सुदृढ नाही, अशा निष्कर्ष काढत ब्रिटनचे जिल्हा न्यायाधीश क्युएन्टिन पर्डी यांनी ही मागणी फेटाळली आहे. मला भारतात पाठविले, तर आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय राहाणार नाही. भारतातील कोठडीतील दगदग मी सहन करू शकणार नाही, असा दावा या संशयिताने केला असून त्याने या खटल्यात मानवी हक्काचा मुद्दाही पुढे आणला असल्याची माहिती ‘ब्रिटिश टॅब्लाइड’ने प्रसारित केली आहे. फ्रेडी पिट्सचे कारनामे ८0च्या दशकात गाजले होते. या कारनाम्यांनी केवळ गोवाच नव्हे, तर सारा देश हादरला होता. अँग्लो जर्मन असलेल्या पिट्सने समाजसेवकाचा बुरखा पांघरून सुरुवातीला कोलव्यात अनाथाश्रम स्थापला होता. त्यानंतर फातोर्डा येथे गुरुकुल नावाचा अनाथाश्रम चालविला होता. या आश्रमात गरीब मुलांना ठेवले होते. (पान ३ वर)