शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र पक्ष स्थापनेचा नाद सोडला : बाबूश

By admin | Updated: June 10, 2014 01:49 IST

पणजी : नवा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने सांताक्रुझचे काँग्रेस आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नवा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा नाद सोडून दिला आहे.

पणजी : नवा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने सांताक्रुझचे काँग्रेस आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नवा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा नाद सोडून दिला आहे. मात्र, काँग्रेसमधून बाहेर पडून जमल्यास भाजपशी सोयरिक करावी व आपल्याऐवजी पत्नीला मंत्रिपद देण्यास भाजपला सांगावे, असा प्रस्ताव मोन्सेरात यांनी पुढे आणला आहे. भाजपने हा प्रस्ताव अजून गंभीरपणे घेतला नसल्याने मोन्सेरात यांची डाळ शिजू शकलेली नाही. प्रसंग येताच काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची तयारी मोन्सेरात यांनी ठेवली आहे. आपण, आपली पत्नी तथा ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात व कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर हे काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात, असे संदेश मोन्सेरात यांनी भाजपपर्यंत पोहोचविले. भाजपच्या संघटनात्मक कामाशी संबंधित एका प्रबळ पदाधिकाऱ्याशी त्यांची बोलणीही झाली. मात्र, मडकईकर यांनी आपण २०१७ सालची निवडणूक काँग्रेसच्याच तिकिटावर लढवणार असून काँग्रेस पक्ष सोडण्याचा आपला मुळीच विचार नाही, असे मोन्सेरात यांना सांगितल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी स्पष्ट केले. मोन्सेरात यांना कोणत्याही स्थितीत काँग्रेस सोडून भाजपशी सोयरिक जुळवायची आहे. माविन गुदिन्हो, मिकी पाशेको यांनीही भाजपशी स्वत:ची सोयरिक जुळविण्याचा प्रयत्न केला; पण त्या दोघांनाही लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपचा प्रतिसाद मिळालेला नाही. मोन्सेरात यांचाही विषय भाजपने गंभीरपणे घेतलेला नाही; पण मोन्सेरात यांनी पत्नीसह पुन्हा निवडणुकीस सामोरे जाण्याची तयारी असून निवडून आल्यास आपल्याऐवजी पत्नीला मंत्रिपद द्यावे, अशी चर्चा भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी केली आहे. मोन्सेरात यांच्या विश्वासातील कार्यकर्त्यांनी मात्र ‘लोकमत’शी बोलताना या सगळ्या अफवा असल्याचा दावा केला. दरम्यान, कुणालाही पक्ष सोडून जायचा असेल, तर त्यांनी खुशाल जावे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले आहे. (खास प्रतिनिधी)