गोव्यात सोनसाखळी पॉलिशच्या बहाण्याने वृध्देला फसविले; लोकांनी बेदम चोपले

By सूरज.नाईकपवार | Published: July 30, 2023 12:20 PM2023-07-30T12:20:10+5:302023-07-30T12:20:35+5:30

लोकांकडून संशयितांना बेदम चोप: इस्पितळात दाखल

In Goa, people cheated the elderly on the pretext of gold chains, and people choked them | गोव्यात सोनसाखळी पॉलिशच्या बहाण्याने वृध्देला फसविले; लोकांनी बेदम चोपले

गोव्यात सोनसाखळी पॉलिशच्या बहाण्याने वृध्देला फसविले; लोकांनी बेदम चोपले

googlenewsNext

सूरज नाईक पवार / मडगाव

मडगाव: सोनसाखळी पॉलिश करुन देतो असे सांगून एका साठ वर्षीय वृध्द महिलेला दोन भामटयांनी फसविण्याची घटना गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील काेलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माजोर्डा या गावी घडली, घडलेला प्रकार स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी संशयितांना  पकडले व त्यांची बरीच धुलाई केली. सदया त्यांच्यावर इस्पितळात उपचार घेण्याची पाळी ओढविली आहे. 

कोलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माजोर्डा येथे शनिवारी दुपारी वरील घटना घडली.चंद्रशेखर साह व सोनु कुमार अशी संशयितांची नावे आहेत. ते मूळ बिहार राज्यातील आहे.भादंसंंच्या ४२० कलमाखाली संशयितांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष गावकर पुढील तपास करीत आहेत. चंद्रा योलगाकर या तक्रारदार आहेत. संशयित शनिवारी तिच्याकडे आले होते. दागिने आम्ही पॉलिश करुन देतो असे सांगितले. तक्रारदार योलगाकरच्या गळयातील साेनसाखळी पॉलिश करण्यासाठी घेतली. या सोनसाखळीवर काही रसायन टाकून सोनसाखळीतील काही सोने वितळले व नंतर मोडलेल्या अवस्थेतीतील सोनसाखळी तिला परत केली. आपण फसविले गेलो हे लक्षात आल्यानंतर योलगाकर हिने कोलवा पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविली.
 

Web Title: In Goa, people cheated the elderly on the pretext of gold chains, and people choked them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.