शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राय-सांतेमळ येथेही बेकायदा कत्तलखाना

By admin | Updated: June 29, 2014 02:03 IST

मडगाव : मडगावातील दोन ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखान्यांत गुरांच्या चरबीचा तुपासाठी वापर केला जातो, ही गोष्ट उघड झाली असताना राय-सांतेमळ येथेही एका घरात अशाच प्रकारे बेकायदेशीर कत्तलखाना चालू होता,

मडगाव : मडगावातील दोन ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखान्यांत गुरांच्या चरबीचा तुपासाठी वापर केला जातो, ही गोष्ट उघड झाली असताना राय-सांतेमळ येथेही एका घरात अशाच प्रकारे बेकायदेशीर कत्तलखाना चालू होता, ही गोष्ट उघड झाली असून या घरातही गायीच्या चरबीने भरलेले डबे सापडल्याने येथेही या चरबीचा तूप बनविण्यासाठी वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात गोग्यान फाउंडेशनने मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली आहे. या कत्तलखान्यातून दोन बैल, दोन पाडसे, दोन म्हशी व एक रेडा यांना अ‍ॅनिमल रेस्क्यूचे अमृतसिंग यांच्या साहाय्याने मुक्त केले आहे. यापैकी काही गुरे सुर्ल येथील एका शेतकऱ्याची असून ती चोरून आणली असावी, असा संशय अमृतसिंग याने व्यक्त केला आहे. राय-सांतेमळ येथील ए. एस. बेपारी याच्या घरातच हा बेकायदेशीर कत्तलखाना चालू होता, अशी माहिती सिंग यांनी दिली. या घरातच गुरे मारली जात होती. या ठिकाणी दोन कढया सापडल्या असून दोन डब्यांत गुरांची चरबी झाकून ठेवल्याचे दिसून आले आहे. बाजूच्या एका खोलीत चरबीने भरलेले डबे साठवून ठेवलेले असावेत, असा संशय सिंग यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची वर्दी मायणा-कुडतरी पोलिसांना देताच पोलीस उपनिरीक्षक देवू माणगावकर घटनास्थळी दाखल झाले. या कत्तलखान्याचा मूळ मालक गायब झाला असून पोलीस आले तेव्हा घरात एक वृद्ध व्यक्ती सापडली. या संदर्भात रात्री उशिरा तक्रार दाखल झाली आहे. शनिवारी सकाळी पशुवैद्यकाच्या उपस्थितीत घटनास्थळाचा रितसर पंचनामा केला जाईल, अशी माहिती मायणा-कुडतरीचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांनी दिली. दरम्यान, गोव्यात कित्येक ठिकाणी अशा प्रकारचे बेकायदेशीर कत्तलखाने चालू असून अशा कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास गोवा सरकार फारसे उत्सुक नाही, असा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृत सिंग यांनी केला. (प्रतिनिधी)