शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
4
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
5
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
6
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
7
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
8
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
9
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
10
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
11
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
12
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
13
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
14
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
15
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
16
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
17
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
18
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
19
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
20
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 18:54 IST

गोव्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असून पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पणजी: गोव्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असून पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच राज्यात 141 इंचांपेक्षा जास्त मोसमी पावसाची नोंद आतार्पयत झाली आहे. त्यामुळे गोव्यात पाच दिवसांचा गणोशोत्सव संपला तरी, पावसाचे विसजर्न मात्र झालेले नसल्याचे चित्र दिसून येते.

2010 साली 141.80 इंच पाऊस राज्यात पडला होता. त्यानंतर आता पाऊस 142 इंचांर्पयत पोहचला असून  पुढील दोन दिवस पाऊस सुरूच राहील असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच व्यक्त केला आहे. तसेच जुलै महिन्यात जसा पाऊस पडतो, तसाच पाऊस आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पडताना दिसून येत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. तसेच उत्तर गोव्यातील वाळवंटी व अन्य नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. सिंधुदुर्गमधील तिळारी धरणाचे पाणी देखील अधूनमधून सोडले जात आहे. त्यामुळे बार्देश, डिचोली व पेडणोतील नद्यांच्या किनारी असलेल्या गावांना काळजी घ्यावी लागत आहे. साखळीतील वाळवंटी ही म्हादई नदीची उपनदीची पाण्याची पातळी 4.80 मीटर्पयत पोहचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर डिचोलीत 3.50 मीटर्पयत पाण्याची पातळी पोहचल्याने साखळी पंपांचा वापर करून पाणी कमी करावे लागलत आहे.

त्याचप्रमाणे गणेशोत्सवाच्या काळातही गोव्यात पावसाने जोरदार बॅटींग केल्याने दीड दिवसांच्या गणपतीचे विसजर्न करताना तर गोमंतकीयांना खूपच गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. तसेच मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. 

टॅग्स :goaगोवाRainपाऊसfloodपूर