जुवारी पुलासाठी केंद्राची १ हजार कोटी देण्याची ग्वाही

By Admin | Updated: June 21, 2014 01:46 IST2014-06-21T01:37:22+5:302014-06-21T01:46:46+5:30

पणजी : जुवारी नदीवर सहा पदरी केबल स्टेड पूल बांधण्याची योजना तयार झाली आहे.

Guarantee to give Center Rs 1,000 crore for Jwari Bridge | जुवारी पुलासाठी केंद्राची १ हजार कोटी देण्याची ग्वाही

जुवारी पुलासाठी केंद्राची १ हजार कोटी देण्याची ग्वाही

पणजी : जुवारी नदीवर सहा पदरी केबल स्टेड पूल बांधण्याची योजना तयार झाली आहे. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्यास केंद्र सरकार तयार आहे. येत्या २३ रोजी या विषयाच्या पाठपुराव्यासाठी बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.
एस. एन. भोबे अ‍ॅण्ड असोसिएट्स या सल्लागार कंपनीचा जुवारी पुलाबाबतचा प्राथमिक अहवाल बांधकाम खात्याकडे आला आहे. अंतिम अहवाल येत्या दोन महिन्यांत येणार आहे. हा पूल बांधा, वापरा व परत करा (बूट) या पद्धतीवर बांधला जाणार नाही; कारण तसे झाल्यास वाहनांकडून टोल आकारावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच गोवा भेटीवर आले असता, या पुलासाठी निधी देण्याची ग्वाही दिली
आहे, असे ढवळीकर यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला सांगितले. (खास प्रतिनिधी)

Web Title: Guarantee to give Center Rs 1,000 crore for Jwari Bridge