शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

सरकार गतिमान

By admin | Updated: November 18, 2014 02:07 IST

मंत्र्यांनी घेतला ताबा : कारभार सुरू; फाईल्स हातावेगळ्या

पणजी : गेल्या आठवड्यात शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी बहुतेक मंत्र्यांनी आपल्या कामाचा ताबा घेतला. सोमवारपासून पूर्ण मंत्रिमंडळाने कामकाज सुरू केले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या फाईल्स काही मंत्र्यांनी हातावेगळ्या करण्यास प्रारंभ केला. मगो पक्षाचे मंत्री सुदिन ढवळीकर, दीपक ढवळीकर यांनीही सोमवारी मंत्रालयात येऊन आपल्या पदाचा ताबा घेतला व काम सुरू केले. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, मजूरमंत्री आवेर्तान फुर्तादो, वनमंत्री अ‍ॅलिना साल्ढाणा यांनीही मंत्रालयात येऊन पदाची सूत्रे स्वीकारली. आपल्या कर्मचारी वर्गाशी चर्चा केली. काही प्रलंबित फाईल्सही हातावेगळ्या केल्या. गेले दहा दिवस प्रशासन काहीसे ठप्प झाले होते. मंत्र्यांकडे खाती नसल्याने फाईल्स फिरत नव्हत्या. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ आता सक्रिय होऊ लागले आहे. या आठवड्यात मंत्रिमंडळाची पहिली बैठकही होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या मंत्र्यांना वजनदार खाती मिळाल्याने ते खुश आहेत; पण मंत्री दीपक ढवळीकर, आवेर्तान फुर्तादो व मिकी पाशेको समाधानी नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. फुर्तादो यांचे ग्रामीण विकास हे खाते काढले गेले आहे. ते खाते मंत्री पाशेको यांना दिले गेले आहे. पाशेको यांच्याकडे ग्रामीण विकास वगळता अन्य महत्त्वाचे खाते नाही. त्यांनी कधीच हाताळली नाहीत अशा प्रकारची खाती त्यांना दिली आहेत. दीपक ढवळीकर यांच्याकडील सहकार खाते मिळाल्याने उद्योगमंत्री महादेव नाईक हे खुश आहेत; पण ढवळीकर नाराज आहेत. मुख्यमंत्रिपदी असताना मनोहर पर्रीकर हे स्वत: खूप सक्रिय असायचे. त्यामुळे अन्य मंत्रीही सक्रिय होण्याचा प्रयत्न करत होते. आता पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत प्रशासन सक्रिय ठेवण्याचे मोठे आव्हान नवे मुख्यमंत्री पार्सेकर यांच्यासमोर आहे. मंत्री, आमदारांच्या विदेश दौऱ्यांनाही लगाम घालण्याची कसरत पार्सेकर यांना करावी लागेल. पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना परिमल रे आणि पवन कुमार सेन हे दोन आयएएस अधिकारी सक्रिय होते. ते पर्रीकर यांच्या खास विश्वासातील मानले जात होते. पर्रीकर संरक्षणमंत्री बनल्याने आता या दोघांचीही दिल्लीत बदली झाली आहे. परिमल रे हे संरक्षण मंत्रालयात काम करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. पर्रीकर मुख्यमंत्री असताना पी. कृष्णमूर्ती हे त्यांचे सचिव होते. आता त्यांचीही बदली होण्याची शक्यता आहे. ते दिल्लीला पर्रीकर यांचे सचिव बनतील, असे कळते. (खास प्रतिनिधी)