शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीआय’बाबत प्रशासन सुशेगाद!

By admin | Updated: June 10, 2014 01:49 IST

सदगुरू पाटील ल्ल पणजी राज्यात माहिती हक्क कायद्याच्या (आरटीआय)

सदगुरू पाटील ल्ल पणजी राज्यात माहिती हक्क कायद्याच्या (आरटीआय) अंमलबजावणीबाबत अजूनही राज्य प्रशासन गंभीरच नाही, असा अनुभव केवळ लोकांना व आरटीआय कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर मुख्य माहिती आयुक्त लीना मेहेंदळे यांनाही येत आहे. सरकार उठसूट पारदर्शकतेच्या गोष्टी बोलते; पण सरकारी खात्यांमध्ये आरटीआय अर्ज स्वीकारण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे, असा अनुभव आरटीआय कार्यकर्त्यांना येत असल्याची माहिती अनेक अर्जदारांकडून ‘लोकमत’ला मिळाली. वीज, सार्वजनिक बांधकाम अशी अनेक मोठी खाती अर्जदारांना इथून-तिथे खेपा मारायला लावतात. या प्रतिनिधीने मेहेंदळे यांची भेट घेऊन त्यांना आरटीआयच्या कार्यवाहीबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या की, अर्जदारांनी अर्ज केल्यानंतर ते अर्ज स्वीकारण्याऐवजी काही कर्मचारी केवळ वाचत बसतात. अर्जदारास अकारण जास्त वेळ कार्यालयातच फिरावे लागते. अशा प्रकारची तक्रार माझ्याकडे आली आहे. बहुतेक खात्यांतील सार्वजनिक माहिती अधिकारी खात्याजवळ किती अर्ज आले व किती अर्ज निकालात काढले गेले, किती प्रलंबित आहेत, याची माहितीही स्वत:जवळ ठेवत नाहीत. प्रत्येक खात्याने आरटीआयसाठी आलेले अर्ज स्वीकारायलाच हवेत, असे मेहेंदळे म्हणाल्या. गोव्यात कोमुनिदादविषयक कागदपत्रे खूप गुंतागुंतीची आहेत. त्यासाठी संशोधन करू शकेल, असा एखादा कर्मचारी मला माझ्या कार्यालयात मिळायला हवा. अलीकडेच रजिस्ट्रार व सचिव मिळाले आहेत. मात्र, अजूनही संगणकाचे बऱ्यापैकी ज्ञान असलेल्या तसेच माझे पूर्ण निवाडे बऱ्यापैकी टाइप करू शकतील, अशा स्टेनोंची गरज आहे. आवश्यक प्रमाणात व चांगले मनुष्यबळ नसल्याने माझ्या स्वत:च्या कामावरही परिणाम होत आहे. कामाचा वेग कमी होतो. तरीही गेल्या काही महिन्यांत अनेक प्रलंबित अर्ज आपण निकालात काढले, असे मेहेंदळे यांनी सांगितले. माझ्या कार्यालयास चांगली वेबसाइटही मिळायला हवी. कायदा किंवा अन्य महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जर एखादा प्रोजेक्ट करायचा असेल, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांच्यासाठी प्रोजेक्टची एक योजना विचाराधीन असल्याचे मेहेंदळे यांनी सांगितले.