शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

क्लब, पब, मसाज केंद्रे बनली सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या

By admin | Updated: December 10, 2014 01:06 IST

पणजी : बार्देसपासून पेडणे तालुक्याच्या किनारपट्टीपर्यंत फोफावणारे पर्यटन हे तेथील पोलीस, लहान-मोठे लोकप्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते, पंचायती आणि गुन्हेगार यांच्या पथ्यावर पडत आहे.

पणजी : बार्देसपासून पेडणे तालुक्याच्या किनारपट्टीपर्यंत फोफावणारे पर्यटन हे तेथील पोलीस, लहान-मोठे लोकप्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते, पंचायती आणि गुन्हेगार यांच्या पथ्यावर पडत आहे. क्लब, पब, नाईट मार्केट्स, मसाज केंद्रे पोलीस, राजकारणी व गुन्हेगारांना हप्त्याच्या रूपात सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या बनल्या आहेत. किनारपट्टी भागात पोस्टिंग मिळावे म्हणून पोलिसांमध्ये जोरदार लॉबिंग चालते. सत्ताधारी पक्षाच्या आमदारास, मंत्र्यास हवा तो पोलीस निरीक्षक पोलीस स्थानकावर नेमला, की मग सगळीच कामे आपसूक होतात. लोकप्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते, गुन्हेगार व पोलीस यांची एक साखळी बार्देस ते पेडणे तालुक्याच्या किनारपट्टीत तयार झाली आहे. सगळेच लोकप्रतिनिधी या साखळीचे भाग नाहीत. मात्र, काही आमदार, एक मंत्री, काही पोलीस अधिकारी व काही गुन्हेगार यांची युती किनारपट्टीत सध्या सक्रिय आहे. आमदार मायकल लोबो यांच्यावर ज्याने हल्ला केला, त्याची कसून चौकशी झाली तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; पण सरकारला हे प्रकरण लवकर निभावलेले हवे आहे. लोबो यांच्यावरील हल्लेखोराचा विषय सरकारने व पोलिसांनी गंभीरपणे घेतला असता, तर हल्लेखोराविरुद्ध आणखी गंभीर कलमे लागू झाली असती व परिणामी त्याला जामीन मिळणेही कठीण झाले असते, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. काही पंचसदस्य, काही अन्य लोकप्रतिनिधी, काही रियल इस्टेट व्यावसायिक, काही गुन्हेगार, पोलीस यांची युती झाल्याने लोकही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून गप्प राहतात. एखाद्या हॉटेलसाठी रस्ता रुंद करून द्यायचा असेल, तर कळंगुट मतदारसंघात व विशेषत: हडफडे पंचायत क्षेत्रात ते काम लवकर होते; पण लोकांची एखादी मूलभूत समस्या सोडविण्याबाबत लोकप्रतिनिधी तत्परता दाखवत नाहीत. पंचायती ज्याप्रमाणे हॉटेल व्यावसायिक व अन्य प्रकल्पांना पीडतात, त्याचप्रमाणे काही लोकप्रतिनिधी, पोलीस आणि गुन्हेगारही विविध व्यावसायिकांना पिळत आहेत. त्यामुळे किनारपट्टीत एखादा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सर्वांना ‘प्रोटेक्शन मनी’ द्यावी लागते, असा अनुभव एका व्यावसायिकाने सांगितला. (खास प्रतिनिधी)