शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

Goa: युक्रेन आणि रशिया संघर्षाचा गोव्याच्या पर्यटनावर परिणाम, पर्यटकांची संख्या रोडावली

By किशोर कुबल | Published: April 08, 2024 1:48 PM

Goa Tourist News: युक्रेन आणि रशिया, गाझा आणि इस्रायल यांच्यातील प्रदीर्घ संघर्ष यामुळे गोव्यातील पर्यटनावर परिणाम झाला आहे. रशियन पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. रशिया आणि इस्रायल या दोन देशांमधून गोव्यात येणाय्रा चार्टर विमानांची संख्या कमी झाली आहे.

पणजी - युक्रेन आणि रशिया, गाझा आणि इस्रायल यांच्यातील प्रदीर्घ संघर्ष यामुळे गोव्यातील पर्यटनावर परिणाम झाला आहे. रशियन पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. रशिया आणि इस्रायल या दोन देशांमधून गोव्यात येणाय्रा चार्टर विमानांची संख्या कमी झाली आहे.

गेल्या वर्षी पहिल्या सात महिन्यांत २.८१ लाखांहून अधिक परदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. त्याआधीच्या दोन वर्षांपूर्वीच्या (२०२१) च्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढ होती. कोविड महामारीनंतर केवळ २२००० परदेशी पर्यटकांनी किनारपट्टी राज्याला भेट दिली होती. २०१८ व २०१९ मध्ये दरवर्षी सरासरी ९  लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती.

रशियन विमानांच्या आगमनामध्ये दर आठवड्याला सहा इतकी मोठी घट नोंदवली गेली आहे. जी एकेकाळी दिवसातून चार उड्डाणे होती. इंग्लंडमधून येणाय्रा चार्टर विमान संख्येतही घट झाली आहे. एकेकाळी हंगाामात ८०० ते ९०० चार्टर विमाने येत असत. एका माहितीनुसार २०१९ साली ९,३७,११३ परदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. नोव्हेंबर २०२३ मध्ये ही संख्या घसरुन  ४,०३,४०४ वर आली. २०१९ मध्ये तब्बल ८०,६४,४०० देशी पर्यटक गोव्यात आले. २०२० मध्ये ते २९,७१,७२६ पर्यंत घसरले.

दुसरीकडे असे दिसून आले आहे की, विदेशी पर्यटक गोव्याऐवजी आता थायलंड, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, तुर्कस्तान आणि व्हिएतनाम आदी देशांमध्ये इतर स्थळांचा शोध घेत आहेत. व्हिसा ऑन अरायव्हलची समस्या, प्रचंड लँडिंग शुल्क आणि अपुय्रा पर्यटन पायाभूत सुविधा यासारख्या समस्यांमुळे परदेशी पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवत आहेत. 

टॅग्स :goaगोवाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाtourismपर्यटन