शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-कोकण महामार्ग काँक्रिटीकरणात गोवाही

By admin | Updated: December 19, 2014 03:43 IST

ढवळीकर : नितीन गडकरी यांच्याशी बैठक यशस्वी

पणजी : मुंबई ते कोकण अशा महामार्गाचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पात गोव्यातील २५२ किलोमीटरच्या मार्गाचा समावेश करावा, अशी मागणी गोवा सरकारने केंद्राकडे केली आहे. त्या दृष्टीने दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी यशस्वी बैठक झाल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ढवळीकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी गडकरी यांची बैठक झाली तेव्हा केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्रालयाचे डायरेक्टर जनरल तसेच मुख्य अभियंते, अन्य वरिष्ठ अधिकारी आणि गोव्याचे मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर उपस्थित होते. मुंबई ते कोकण अशा मार्गाच्या काँक्रिटीकरणाची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने आखली आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाच्या या कामात गोव्यातील २५२ किलोमीटरचा मार्गही समाविष्ट केला जावा, अशी मागणी आम्ही केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर ठेवली. त्याविषयी खूप चर्चा झाली. ही मागणी केंद्राने तत्त्वत: मान्य केली. या प्रकल्पाचे काम गोव्यात होईल तेव्हा काही पूलही बांधले जाणार आहेत. यावर खर्च किती येईल व किती प्रमाणात लोकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल, पुनर्वसन किती करावे लागेल हा सगळा तपशील यापुढे ठरणार आहे, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. आम्ही लोकांना नुकसान भरपाई निश्चितच देऊ, असे ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)