शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातच राजकीय भूकंप होईल, गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 18:55 IST

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोव्यात शिरकाव करण्याची स्वप्ने पाहू नयेत.

पणजी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोव्यात शिरकाव करण्याची स्वप्ने पाहू नयेत. गोव्यात शिवसेनेला स्थानच नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी येथे नमूद केले व येत्या सहा महिन्यांत कदाचित महाराष्ट्रातच राजकीय भूकंप होईल, असाही दावा त्यांनी केला. गोव्यातील विरोधी बाकांवरील अवघ्याच आमदारांनी शिवसेनेच्या नादाला लागणे हा मूर्खपणा आहे, असे राणे म्हणाले.येथे पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री राणे म्हणाले की, गोव्यातील सगळे मंत्री हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वासोबत आहेत. गोव्यात सत्ता बदलाचा प्रश्नच येत नाही, कारण भाजपा सरकारकडे येथे 30 आमदारांचे संख्याबळ आहे. विरोधात फक्त दहा आमदार आहेत. त्यापैकीही एखाद्याला जर मंत्रिपदाची ऑफर दिली गेली, तर सगळेच आमच्या बाजूने धावत येतील. शिवसेनेला गोव्यात यापूर्वीही कधीच स्थान मिळाले नाही व यापुढेही मिळणार नाही.मंत्री राणे म्हणाले, की गोव्यात राजकीय भूकंप होईल किंवा गोवा सरकार पडेल, अशी हास्यास्पद विधाने संजय राऊत करत आहेत. राऊत यांना अशी विधाने करून महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळते, पण गोव्यात त्यांचे हसे होते. शिवसेनेला महाराष्ट्रात लॉटरी लागली पण येत्या सहा महिन्यांत कदाचित महाराष्ट्रातच राजकीय भूकंप होईल. गोव्यातील जे अवघेच विरोधी आमदार शिवसेनेला सोबत घेऊन विरोधी आघाडी स्थापन करू पाहत आहेत, त्यांनी जरा दक्षिण गोव्याचाही विचार करावा. शिवसेना म्हटले की, ख्रिस्ती मतदार घाबरतात. शिवसेनेला मिठी मारण्याच्या प्रयत्नांचा उत्तर व दक्षिण गोव्यावर काय परिणाम होईल याचा विचार विजय सरदेसाई यांनीही करावा.मंत्री राणे म्हणाले, की गोवा भाजपाचे कुठचेच आमदार शिवसेनेसोबत जाऊ शकत नाहीत, कारण त्यांना राजकीय आत्महत्या करायची नाही. सरकार स्थिर आहे. शिवसेनेसारख्यांच्या नादाला लागणे हा मूर्खपणा आहे. हाती तलवार घेणा-या शिवसेनेला जर तलवारी कमी पडत असतील तर आम्हीच त्या उपलब्ध करून देऊ, पण त्यांनी त्या तलवारी महाराष्ट्रापुरत्याच मर्यादित ठेवाव्यात. पोर्तुगीजांविरुद्ध लढताना गोमंतकीयांनी खूप तलवारी मिळविल्या आहेत. आमच्या जुन्या घरीही तलवारी आहेत. विरोधातील दहापैकी नऊ आमदारांना आपण त्या तलवारी देऊ शकतो.

टॅग्स :goaगोवा