शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या हस्ते नव्या मांडवी पुलाची पायाभरणी

By admin | Updated: June 11, 2014 01:19 IST

पणजी : मांडवी नदीवर तिसरा पूल बांधण्याच्या कामाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता केली जाणार आहे,

पणजी : मांडवी नदीवर तिसरा पूल बांधण्याच्या कामाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता केली जाणार आहे, अशी माहिती मिळाली. पंतप्रधानांच्या सहभागाने शनिवारी दिवसभर चार वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. नौदलाच्या विमानासाठी वास्को येथे साकारलेल्या किनाराधिष्ठित चाचणी सुविधेचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी गोव्यात येत आहेत. त्यानिमित्ताने पणजीत त्यांचे अन्य कार्यक्रमही ठरले आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मोदी यांची दिल्लीत मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली. दोनापावल येथील स्व. दिनदयाळ उपाध्याय स्टेडियममध्ये भाजपच्या सुमारे सात हजार कार्यकर्त्यांच्या सभेत मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सातच्या सुमारास मिरामार येथील एका हॉटेलात राज्यभरातील सुमारे दीडशे बुद्धिवादी व्यक्तींशी पंतप्रधानांचा चर्चात्मक कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी मांडवी नदीवर तिसरा पूल बांधण्याच्या कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी केली जाणार आहे. गोवा प्रदेश भाजपची मंगळवारी येथील मिनेझिस ब्रागांझा संस्था सभागृहात बैठक झाली व त्या बैठकीत मोदी यांचे सगळे कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्णय झाला. दिल्लीहून परतल्यानंतर मुख्यमंत्रीही त्या बैठकीस उपस्थित राहिले. (खास प्रतिनिधी)