शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

फोंडा, धारबांदोड्यात पडझड

By admin | Updated: June 15, 2015 01:33 IST

फोंडा : शनिवार रात्रीपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे फोंडा, तसेच धारबांदोडा तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

फोंडा : शनिवार रात्रीपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे फोंडा, तसेच धारबांदोडा तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बोरी येथील नाल्यात पडलेल्या इसमाला फोंडा अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. तर आडपई येथे पडझडीमुळे घराचे २0 हजारांचे नुकसान झाले. तसेच झाडे व दगड कोसळण्याच्या घटनांमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबली. कोने-प्रियोळ येथील राष्ट्रीय महामार्गावर डोंगरावरील दोन मोठे दगड रस्त्यावर कोसळण्याची घटना घडली. संततधार अशीच सुरू राहिल्यास या भागात दरड कोसळण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. येथील डोंगरकड्यांना काही भागात संरक्षक भिंत नसल्यामुळे असे प्रकार होत असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच सध्या गोव्याबाहेर असलेले वेलिंग-प्रियोळ-कुंकळयेचे सरपंच दामोदर नाईक यांनी बांधकाम खात्याला कळवून दगड रस्त्यावरून हटवले. रविवारी सकाळी पणसुले आणि धारबांदोडा या भागात राष्ट्रीय महामार्गावर झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीत व्यत्यय आला. धारबांदोडा तालुक्यात अग्निशमन दलाचे कार्यालय नसल्यामुळे स्थानिकांनी फोंडा अग्निशमन दलाशी संपर्क साधला. नेमके त्याच वेळी शिरोड्यातही रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. मागाहून जवानांनीच झाडे हटवली. धारबांदोड्यात सर्व सरकारी कार्यालये पुरविण्यात आली आहेत. मात्र, अत्यावश्यक असलेले अग्निशमन दलाचे कार्यालय अद्याप उपलब्ध न केल्याने या भागात नाराजी व्यक्त होत आहे. निदान पावसाळ्यात तरी दलाचा एक बंब व काही जवान या भागात तैनात ठेवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)