शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वांदा आलेमाववर एफआयआर दाखल करा

By admin | Updated: December 9, 2014 00:55 IST

मडगाव : सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांची कन्या वांंदा आलेमाव हिच्या विरोधात दुहेरी नागरिक प्रतिबंध कायद्याखाली दोन

मडगाव : सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांची कन्या वांंदा आलेमाव हिच्या विरोधात दुहेरी नागरिक प्रतिबंध कायद्याखाली दोन आठवड्यांच्या आत एफआयआर नोंद करा, असा आदेश मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बॉस्को रॉबर्ट्स यांनी दिला असून मागचे नऊ महिने या प्रकरणात एफआयआर नोंदविला नसल्यामुळे कोलवा पोलिसांवर ताशेरेही ओढले आहेत. वांंदा आलेमाव हिच्या जन्माची नोंदणी पोर्तुगालामध्ये केली असून तिने दुहेरी नागरिकत्व स्वीकारल्याचा दावा करून काशिनाथ शेटये आणि अन्य दोघांनी २४ मार्च रोजी कोलवा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, कोलवा पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंद न केल्यामुळे फौजदारी दंड संहितेच्या १५४ कलमाखाली प्रथम वर्ग न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात कोलवाचे निरीक्षक व दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांना प्रतिवादी बनविले होते. शेटये यांची मागणी उचलून धरताना न्या. बॉस्को यांनी कुठल्याही व्यक्तीने गुन्हा केल्याचे पोलिसांच्या लक्षात आणून दिले तर त्या व्यक्तीवर एफआयआर दाखल करणे पोलिसांवर बंधनकारक असते. काही अपवादात्मक प्रसंगीच पोलीस प्राथमिक चौकशी करून एफआयआर नोंदवू शकतात, याकडे लक्ष वेधले. या प्रकरणात वांंदा आलेमाव यांनी दखलपात्र गुन्हा केल्याचे तक्रारदारांनी कोलवा पोलिसांच्या लक्षात आणून देऊनही ९ महिने या तक्रारीवर पोलिसांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी अर्जदाराने न्यायालयात दावा दाखल केला असता ५ मे २०१४ रोजी कोलवा पोलिसांनी यासंबंधी सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला होता. मात्र, हा अहवालही न्यायालयात सादर केला गेला नाही याकडे या आदेशात लक्ष वेधले आहे. या प्रकरणात पोलिसांची बाजू मांडताना अ‍ॅड. जी.डी. कीर्तनी यांनी भारतीय नागरिक कायद्याच्या काही कलमांखाली निर्णय घेण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारच्या संबंधित अधिकारिणीला असल्याचा दावा केला होता. (प्रतिनिधी)