शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

''पीएमसी बँकेचे संचालक विदेशात पळून जाण्याआधी त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवा''

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 12:36 IST

पीएमसी बँकेचे संचालक विदेशात पळून जाण्याआधी त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अर्थतज्ज्ञ प्रा. गौरव वल्लभ यांनी केली आहे.

पणजी : पीएमसी बँकेचे संचालक विदेशात पळून जाण्याआधी त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अर्थतज्ज्ञ प्रा. गौरव वल्लभ यांनी केली आहे. खातेधारकांना बँकेतील पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध रिझर्व्ह बँकेने त्वरित उठवावेत, असे आवाहन त्यांनी केले. गोव्यातील म्हापसा अर्बन बँकेचे पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेत (पीएमसी) विलीनीकरणाचा प्रस्ताव होता. 

पत्रकार परिषदेत वल्लभ म्हणाले की, ‘बँकेतून पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध त्वरित उठविले जावेत. रिझर्व्ह बँकेने संचालकांना बोलावून त्यांची चौकशी करावी तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवावेत. नपेक्षा संचालक विदेशात पळून जातील.’ ते म्हणाले की,‘बँक एका रात्रीत डबघाईला आलेली नाही. बँक बुडत असल्याचे किंवा बँकेतील गैरव्यवहारांचे संकेत आधीच रिझर्व्ह बँकेला मिळाले असतील. तसे असले तर मग रिझर्व्ह बँंकेने त्याकडे दुर्लक्ष का केले? कोण याला जबाबदार आहे याचीही चौकशी व्हायला हवी. संचालक मंडळाने खरी माहिती का लपविली?’

भाजपाचेच नेते किरीट सोमय्या यांनी या बँकेत तब्बल ३ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. पीएमसी बँकेने कर्ज थकलेल्या एका कंपनीला मोठे कर्ज दिलेले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. वल्लभ म्हणाले की, ‘सत्ताधारी भाजपशी या बँकेच्या संचालकांचे हितसंबध आहेत म्हणूनच कारवाईबाबत टाळाटाळ केली जात आहे. मुलुंडमध्ये ४ वेळा आमदार बनलेल्या राजकीय नेत्याचा पुत्र या बँकेवर संचालक आहे. 

वल्लभ म्हणाले की, बँकेतील प्रत्येक खातेधारकाला त्याचे पैसे काढायला मुभा मिळाली पाहजे. लोकांनी बचत करुन पैसे बँकेत ठेवलेले असतात. बँक व्यवस्थापनाच्या चुकीमुळे किंवा राजकीय हस्तक्षेपामुळे खातेधारकांना वेठीस धरले जाऊ नये. पीएमसी बँकेमध्ये महाराष्ट्रातील इतर सहकारी बँकांच्याही मोठ्या रकमेच्या कायम ठेवी आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांच्या ठेवी आहेत त्यांना हे पैसे काढायला मिळायला हवेत. वल्लभ म्हणाले की, ‘ बँकांमधील घोटाळ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका आकडेवारीचा हवाला देऊन त्यांनी असा दावा केला की, २0१८ मध्ये तब्बल ४१,१६७ कोटींचा बँक घोटाळा झाला. २0१९ मध्ये हा आकडा आतापर्यंत ७१,५४३ कोटींवर पोहोचला आहे. बिगर उत्पादक मालमत्तेचे प्रमाण सहापटींनी वाढले आहे. पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सरचिटणीस प्रदीप नाईक, प्रदेश काँग्रेसच्या मिडिया कम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रतिभा बोरकर उपस्थित होत्या.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँक