शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सिस डिसोझांनी मुख्यमंत्री व्हावे!

By admin | Updated: October 7, 2014 01:42 IST

पणजी : पर्रीकर सरकारमधील काही मंत्री व आमदार हे उपमुख्यमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांचे कट्टर समर्थक आहेत. काहीजण डिसोझा यांच्या गटातील मानले जातात.

पणजी : पर्रीकर सरकारमधील काही मंत्री व आमदार हे उपमुख्यमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांचे कट्टर समर्थक आहेत. काहीजण डिसोझा यांच्या गटातील मानले जातात. डिसोझा हे मुख्यमंत्री बनावे, अशी सुप्त इच्छा काही मंत्री, आमदारांची आहे. शनिवारी उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवस सोहळ्यावेळी जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी जाहीरपणे आपल्या भावना व्यक्त केल्या, तेव्हा अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या गेल्या. यावर डिसोझा यांनी मात्र केवळ स्मित केले. मंत्री मांद्रेकर, आमदार किरण कांदोळकर, आमदार लोबो, ग्लेन टिकलो हे डिसोझा यांचे कट्टर समर्थक आहेत. शिवोलीचे आमदार असलेले मांद्रेकर यांचे तर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी पटतही नाही. मांद्रेकर व पर्रीकर यांच्यात संवादही खूप कमी होतो. मंत्री मांद्रेकर यांनी डिसोझा यांच्या वाढदिवस सोहळ्यावेळी मुख्यमंत्रिपदाचा विषय उपस्थित केला. डिसोझा व मी एकाच वेळी आमदार बनलो. डिसोझा हे मुख्यमंत्री बनायला हवेत. ते निदान पंधरा दिवस तरी किंवा दोन दिवस तरी मुख्यमंत्री बनावे, अशी इच्छा मांद्रेकर यांनी व्यक्त केली. यानंतर आमदार लोबो यांनीही तोच सूर लावला. मांद्रेकर यांच्या भावनांशी मी सहमत आहे. डिसोझा हे कधी तरी मुख्यमंत्री बनायला हवेत, असे म्हणत लोबो यांनी मांद्रेकरांना पाठिंबा दिला. (खास प्रतिनिधी)