शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! क्वारंटिन केलेल्या 'त्या' व्यक्तीला सोडण्यासाठी नेत्याचे डॉक्टरांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 22:01 IST

क्वारंटिन केंद्रातून निघण्यासाठी डॉक्टरांना धमक्या; दबाव आणण्याचा प्रयत्न

- वासुदेव पागीपणजी: सरकारी क्वारन्टाईन व्यवस्थेत ठेवण्यात आलेल्या लोकात सभ्य मंडळीही असतात, परंतु त्या ठिकाणच्या डॉक्टरसह इतर वैद्यकीय मंडळीला वैताग आणला तो काही खलाशांनी. आत्ताच चाचणी अहवाल द्या, घरी जाऊ द्या, या मंत्र्याला  फोन करेन आणि त्या नेत्याला फोन करेन अशा सततच्या धमक्याही काही खलाशी देत राहतात अशी माहिती सरकारी क्वारन्टाईनची व्यवस्था पाहणाऱ्यांकडून देण्यात आली. विदेशात जहाजांवर काम करणारे गोमंतकीय खलाशी विदेशातच अडकून पडले होते. राज्य व केंद्र सरकारच्या प्रयत्नातून त्यांना गोव्यात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ते करताना एक प्रमाण पद्धती ठरवण्यात आली व ती सर्वांना लागू झाली. त्यानुसार त्यांना गोव्यात पोहोचल्यावर सरकारी क्वारन्टाईनमध्ये ठेवले जाते. त्या ठिकाणी त्याची कोरोनासाठी चाचणी केली जाते. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर थेट कोविड इस्पितळात आणि नेगेटीव्ह आला तर ७ दिवस सरकारी क्वारन्टाईनमध्ये व नंतर  ७ दिवसांच्या होमक्वारन्टाईनमध्ये पाठविले जाते. क्वारन्टाईनमध्ये काम करणाऱ्या काही डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून दैनिक लोकमतनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी धक्कादायक गोष्टी सांगितल्या. बऱ्याच खलाशांना ७ दिवस सरकारी क्वारन्टाईनमध्ये थांबण्याचा संयम नसतो. चाचणी अहवालही त्यांना ताबडतोब हवा असतो. ‘मला घरी पाठवा मी अमुक मंत्र्याचा माणूस आहे आणि तमुक नेत्याचा माणूस आहे’, अशी धमक्या म्हणून करतात. दोन डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यातील एका नेत्याने एका खलाशाला घरी पाठवण्यासाठी दोन वेळा शिफारस करणारे फोन केले होते. कितीही धमक्या इशारे आले तरी संहिता मोडण्याच्या भानगडीत कुणी डॉक्टर किंवा इतर अधिकारी पडत नसतात. कारण त्यामुळे उद्या विपरित काही घडले तर त्याची जबाबदारी ही संबंधित डॉक्टर किंवा अधिकाऱ्यावर येणार आहे. फोन करून दबाव टाकल्यामुळे काहीही परिणाम होत नसल्यामुळे आता वशिलाचे फोन येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु काही खलाशांच्या कुरबुरी थांबलेल्या नाहीत. ते घरी जाण्यासाठी अधीर झाले आहेत. त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. परंतु परिस्थितीचे गांभीर्यही त्यांनी समजले पाहिजे असेही एका डॉक्टरने सांगितले.VIDEO: पाकिस्तानातून आलेलं 'ते' संकट महाराष्ट्रात; कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यताअडकलेल्या मजुरांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदला गब्बरचा सलामराज्य सरकार अपयशी, त्यांना नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंचं ठाकरे सरकारवर शरसंधान

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या