शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: नोकऱ्या  वाचविण्यासाठी घेतला पर्यटन सुरू करण्याचा निर्णय, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 20:17 IST

गोव्यात अनेकांच्या नोकऱ्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे  पर्यटन व्यवसाय नव्याने सुरू करावा लागला, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.

पणजी  - गोव्यात पर्यटन व्यवसाय नव्याने सुरू करावा अशा प्रकारचा दबाव हा उद्योग क्षेत्रकडून येत होता. अनेकांच्या नोकऱ्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे  पर्यटन व्यवसाय नव्याने सुरू करावा लागला, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.पर्यटन धंदा सुरू करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय नव्हता व नाही. सर्व आर्थिक उपक्रम सुरू व्हायला हवेत. ते बंदच ठेवता येणार नाहीत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात लोक किंवा पर्यटक येतील. आमच्याकडे तपासणी केली जातेच. आंतरराष्ट्रीय पर्यटक म्हणजेच विदेशातून कुणी पर्यटक गोव्यात येणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झालेली नाही. देशांतर्गत व्यवहार सुरू झाल्याने देशी पर्यटक येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यातच सर्वाधिक कोविड चाचण्या होतात.मी साखळीतच राहतो  कोविड नियंत्रणात आहे. कोविडची रुग्ण संख्या वाढली असे दिसते, कारण आम्ही मोठय़ा प्रमाणात कोविडच्या चाचण्या करतो. मात्र कोविड नियंत्रणाबाहेर गेलेला नाही. साखळीत काही ठिकाणी कोविडग्रस्त आढळले पण मी साखळीतच राहतो. मी पणजीत राहतो असा चुकीचा दावा एका विरोधी आमदाराने नुकताच केला. मी लोकांना माङया घरी भेटतो. तो आमदार मात्र लोकांना घरीच घेत नाही. मी रोज साखळीला जातो, रात्री साखळीच्याच घरी राहतो, त्या आमदाराने वाटल्यास चहा पिण्यासाठी सकाळी आमच्या घरी यावे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.दरम्यान, पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी विरोध केला. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले आमदार विजय सरदेसाई यांनीही पर्यटन धंदा नव्याने सुरू करण्यास आक्षेप घेतला. कोविडची रुग्णसंख्या गोव्यात प्रचंड वाढेल. सरकार चुकीचे करतेय. सरकार यापुढे मद्यालयेही सुरू करू पाहत आहे. प्रत्येक व्यवहार सरकार नव्याने सुरू करू पाहतेय, कारण काही मंत्र्यांना विकास कामांवर पैसे करायचे आहेत. काही मंत्र्यांचे रोड शोही सध्या बंद झाले आहेत, असे सरदेसाई म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाtourismपर्यटनPramod Sawantप्रमोद सावंत