शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसतर्फे आंदोलनाचा नारा

By admin | Updated: June 28, 2014 01:50 IST

पणजी : काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक दिग्विजय सिंग यांनी गोव्यातील मरणासन्न विरोधी काँग्रेस पक्षात प्राणवायू फुंकण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेवटी जाग येऊन काँग्रेसने राज्यात

पणजी : काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक दिग्विजय सिंग यांनी गोव्यातील मरणासन्न विरोधी काँग्रेस पक्षात प्राणवायू फुंकण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेवटी जाग येऊन काँग्रेसने राज्यात आंदोलनाच्या दृष्टीने आखणी केली आहे. ७ रोजी रेल्वे स्थानकांवर, तर २२ रोजी काँग्रेसतर्फे विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीची बैठक शुक्रवारी म्हापसा येथे पार पडली. त्या बैठकीवेळी दिग्विजय सिंग यांनी गोव्यातील काँग्रेसला मार्र्गदर्शन करत पक्ष संघटनेत प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने राज्य सरकारच्या गैरकारभाराविरुद्ध लढावे, अशी हाक त्यांनी उपस्थित काँग्रेसजनांना दिली. काँग्रेसने आंदोलन करणे निश्चित केले आहे. रेल्वे भाड्यात केंद्र सरकारने केलेल्या मोठ्या दरवाढीच्या निषेधार्थ येत्या ७ जुलै रोजी काँग्रेस पक्षाकडून राज्यातील सर्व सहा रेल्वे स्थानकांवर मोर्चाचे आयोजन केले आहे. २२ जुलै रोजी विधानसभेवर मोर्चा नेऊन राज्य सरकारच्या गैरकारभाराचा निषेध केला जाणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ७ रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने त्या दिवशी राज्यातील थिवी, पेडणे, वास्को, करमळी, सावर्डे आणि मडगाव अशा सहा रेल्वे स्थानकांवर गट काँग्रेस समित्या मोर्चे नेतील व रेल्वे तिकीट दरवाढ मागे घेतली जावी म्हणून आंदोलन करतील, असे फर्नांडिस यांनी सांगितले. २२ जुलै रोजी विधानसभा अधिवेशनास आरंभ होत आहे. त्या दिवशी पर्रीकर सरकारवर आरोपपत्र सादर करण्यासाठी मोर्चा नेला जाणार आहे. स्वत: दिग्विजय सिंगही या मोर्चात भाग घेणार आहेत, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. सिंग यांच्यासह फर्नांडिस, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, खासदार शांताराम नाईक, अ‍ॅड. रमाकांत खलप आदींनी प्रदेश काँग्रेसच्या बैठकीवेळी मनोगते व्यक्त केली. आमदारांना सक्रिय करण्यास येईन काँग्रेसचे आमदार सरकारविरुद्ध संघर्ष करत नाहीत, असा मुद्दा काहीजणांनी बैठकीत मांडला. विधानसभा अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे २१ जुलै रोजी आपण गोव्यात येईन. आपण आमदारांची बैठक घेईन व आमदारांना सक्रिय करीन, असे दिग्विजय सिंग यांनी सांगितले. तसेच यापुढे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकांना प्रदेशाध्यक्ष फर्नांडिसही उपस्थित राहतील, असे ते म्हणाले. महत्त्वाची पदे देऊ नका लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबतही बैठकीत चर्चा झाली. जे कुणी काँग्रेस पक्ष सोडून जातात, त्यांना पुन्हा पक्षात आल्यानंतर महत्त्वाचे पद दिले जाऊ नये, असा मुद्दा एका पदाधिकाऱ्याने मांडला. रवी नाईक हे यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. तिथे ते उपमुख्यमंत्री बनले. ते पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले गेले हे चुकीचे होते, असे उदाहरण या पदाधिकाऱ्याने नमूद केले. (खास प्रतिनिधी)