शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

चिनी निर्माते वाँग कार-वॉयना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार

By admin | Updated: November 15, 2014 02:05 IST

पणजी सजतेय : देश-विदेशांतील कलाकारांची उपस्थिती लाभणार

पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी राजधानी पणजी सजू लागली आहे. येत्या गुरुवारी इफ्फीचा पडदा उघडला जाणार असून, माहोल तयार होऊ लागला आहे. महोत्सवात चीनचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते वाँग कार-वॉय यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन इराणी चित्रपट ‘मोहसेन माकालबग’ या चित्रपटाने होणार आहे. या वेळी चिनचे चित्रपट निर्माते झाँग जिझी, स्विडनचे चित्रपट निर्माते जॅनट्रोईल, पोलँडचे कारजिस्ट झनुसी हे उपस्थित असणार आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध कलाकार अभिताभ बच्चन यांच्या हस्ते यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत (शिवाजी गायकवाड) हेही सोहळ्याला उपस्थित असतील. चित्रपट निर्माते वाँग कारवाय यांच्या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. यंदाच्या खास सिंहवलोकनात्मक विभागात गुलझार व जाहानु बरुआवर आधारित चित्रपट होणार आहेत. विशेष आदर विभागात रिचर्ड एॅटनबरो, रॉबिन विल्यम, जोहरा सहगल व सुचित्रा सेन यांच्यावर चित्रपट दाखविण्यात येतील. खास खंडणी विभागात फारुख शेख यांच्यावरील चित्रपट झळकणार आहेत. त्या व्यतिरिक्त नृत्य, व्यक्तिमत्त्व आधारित कार्यशाळा, मास्टरक्लास इत्यादी आकर्षणे इफ्फीत दिसणार आहेत. बारा हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधींची आतापर्यंत नोंदणी झाली आहे. मंगळवारपर्यंत मिळून एकूण पंधरा हजार प्रतिनिधींची नोंदणी होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना इफ्फीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यात चिनी, जपानी, आशियायी, बरोबरच कन्नड, मल्याळम्, मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती असेल. रेडकार्पेटसाठी खास व्यवस्था करण्यात आली असून, मोजके आणि प्रसिद्ध कलाकार रेडकार्पेटवर झळकणार आहेत, असे महोत्सव संचलनालयाच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)