गोव्यात ८ ते १० रोजी हलक्या पावसाची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2024 02:33 PM2024-04-05T14:33:56+5:302024-04-05T14:34:22+5:30

राज्यात मागील काही दिवसांपासून प्रचंड उष्णता तसेच काेरडे हवामान पहायला मिळत आहे. 

chance of light rain in goa on 8th to 10th | गोव्यात ८ ते १० रोजी हलक्या पावसाची शक्यता 

गोव्यात ८ ते १० रोजी हलक्या पावसाची शक्यता 

नारायण गावस, पणजी: गोव्यात ८ एप्रिल ते १० एप्रिलपर्यंत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्य हवामान खात्याने  ७  एप्रिल रोजी राज्यातील हवामान कोरडे राहण्याची असल्याचे म्हटले आहे. तसेच ८ ते १० एप्रिल रोजी काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून प्रचंड उष्णता तसेच काेरडे हवामान पहायला मिळत आहे. 

राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी काही ठिकाणी धुके पडण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. राज्यात सध्या सर्वाधिक कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान २४ अंश सेल्सियस आहे. पुढील पाच दिवस कमाल तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे विभागाने म्हटले आहे. तरीही दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत आहे. 

वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लाेकांनाही हलक्या पावसाच्या आवश्यकता आहे. शरिराला गारवा मिळविण्यासाठी पाऊस पडणे गरजेचे आहे. यंदा नोव्हेबर पासून पाऊस गेल्यावर अवकाळी पावसाच्या सरी पडलेली नाही. त्यामुळे आता गेले पंधरा दिवस तापमान वाढत आहे. ढगाळ वातावरण होत असल्याने पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे.

Web Title: chance of light rain in goa on 8th to 10th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.