शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यांचा बफर झोन कमी होणार!

By admin | Updated: June 12, 2014 01:28 IST

पणजी : राज्यातील अभयारण्यांचा बफर झोन कमी व्हावा आणि म्हादई व नेत्रावळी अभयारण्यांमधील खनिज खाणी टप्प्याटप्प्याने बंद करण्यास मुभा द्यावी,

पणजी : राज्यातील अभयारण्यांचा बफर झोन कमी व्हावा आणि म्हादई व नेत्रावळी अभयारण्यांमधील खनिज खाणी टप्प्याटप्प्याने बंद करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी आपण केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यासह अन्य कायदेशीर बाजूंबाबतही आपण दिल्ली भेटीवेळी पर्यावरण मंत्रालयाशी चर्चा केली. मांडवी नदीपलीकडील चोडण अभयारण्यास यापूर्वी केंद्रीय मंत्रालयाने शंभर मीटरचा बफर झोन ठरविला आहे. तो रद्द करून शून्य मीटर बफर झोन करावा आणि काणकोणमधील खोतीगाव अभयारण्यास तीन किलोमीटरऐवजी एक किलोमीटरचा बफर झोन केला जावा, अशी मागणी आपण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. म्हादई व नेत्रावळी अभयारण्यांमध्ये ३२ गावे अडकलेली असून ती गावेही बाहेर काढायला हवीत. चोडणच्या सलीम अली पक्षी अभयारण्यास एक किलोमीटरचा बफर झोन केल्यास पणजीपर्यंत कोणताच हॉटेल व्यवसाय किंवा पर्यावरणापूरक असा उद्योगदेखील चालविता येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. खोतीगावसह अन्य अभयारण्यांसाठीही राष्ट्रीय महामार्गासारख्या सुविधा या बफर झोनच्या सीमा म्हणून मान्य करायला हव्यात. बफर झोनमधील खनिज खाणी तत्काळ बंद न करता त्या पाच ते दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने बंद केल्या जाव्यात, अशीही मागणी केंद्रीय मंत्रालयासमोर ठेवली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)