शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बुडालेल्या चारही जणांचे मृतदेह सापडले

By admin | Updated: May 31, 2014 01:37 IST

दोडामार्ग : परमे येथे तिळारी नदीपात्रात बुडालेल्या एकाच कुटुंंबातील चौघाही भावंडांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी नदीपात्रातून बाहेर काढले.

 दोडामार्ग : परमे येथे तिळारी नदीपात्रात बुडालेल्या एकाच कुटुंंबातील चौघाही भावंडांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी नदीपात्रातून बाहेर काढले. मृतदेह शोधण्याचे काम सकाळी ६ वाजल्यापासूनच हाती घेण्यात आले होते. चार तासांच्या अथक परिश्रमानंतर ग्रामस्थांच्या शोधकार्यास यश आले. गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास परमे येथे तिळारी नदीपात्रात हत्तीचा गुंडा या ठिकाणी अर्जुन वासुदेव आरोसकर हे आपला मुलगा अक्षय आरोसकर (१७), आकाश आरोसकर (१८), मुलगी अरुणा आरोसकर (२१), भाचा अंकित अंकुश गवस (१८) व भाची अक्षता अंकुश गवस (१५) यांना घेऊन आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ केल्यानंतर नदीपात्रातून बाहेर पडत असतानाच अरुणा हिचा पाय घसरल्याने ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात अक्षय, आकाश, अंकित व अक्षता यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आणि यातील कोणालाच पोहता येत नसल्याने पाचही भावंडे वाहून गेली. या वेळी अर्जुन आरोसकर यांनी लाकडी बांबू नदीत टाकून भाचीला वाचविले; परंतु तोपर्यंत इतर चारही जण पाण्यात बुडाली होती. सायंकाळच्या वेळी ही घटना घडल्याने काळोखामुळे त्यांचा शोध घेणे शक्य नव्हते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच नदीपात्रात शोधकार्यास सुरुवात करण्यात आली. शोधकार्यात मनसेचे उपतालुकाध्यक्ष मायकल लोबो, साटेली-भेडशीचे माजी उपसरपंच संजय धर्णे, नागेश मयेकर, परमे येथील कांता नाईक व इतरांनी सहभाग घेतला. चार तासांच्या अथक परिश्रमानंतर १० वाजण्याच्या सुमारास अक्षय व आकाश आरोसकर आणि अंकित गवस यांचे मृतदेह हाती लागले. त्यानंतर तासाभराने अरुणाचा मृतदेह सापडला. (प्रतिनिधी)