शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना बिलांची सक्ती

By admin | Updated: June 12, 2014 01:29 IST

पणजी : राज्यातील सर्व प्रकारचे व्यापारी, विक्रेते आदींनी अडिचशे रुपयांपेक्षा जास्त किमतीची खरेदी करणाऱ्या ग्राहकास बिल देणे आता सक्तीचे होणार आहे.

पणजी : राज्यातील सर्व प्रकारचे व्यापारी, विक्रेते आदींनी अडिचशे रुपयांपेक्षा जास्त किमतीची खरेदी करणाऱ्या ग्राहकास बिल देणे आता सक्तीचे होणार आहे. त्याबाबतचे नियम तयार झाले असून अशा प्रकारचे बिल न देणाऱ्या विक्रेत्यास यापुढील काळात दंड ठोठवण्याचे राज्य सरकारच्या वाणिज्य कर खात्याने ठरविले आहे. महसूल गळती रोखण्यासाठी सरकारने हा नवा उपाय काढला आहे. पुढील महिन्याभरात नवे नियम अधिसूचित व्हायची शक्यता आहे, असे वाणिज्य कर खात्याच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, पेट्रोलवरील व्हॅट सरकारने जवळजवळ रद्द केल्यानंतर गोवा सरकार गेल्या दोन वर्षांत एकूण सुमारे पाचशे कोटींच्या महसुलास मुकले आहे. डिझेलवर मात्र वार्षिक सुमारे चारशे कोटींचा महसूल सरकारला मिळत आहे. विमानांसाठीच्या टर्बाइन इंधनावर गोवा सरकारला अगोदर सुमारे ७० कोटींचा महसूल मिळत होता. सरकारने त्यावरील कराचे प्रमाणही कमी केल्याने महसुलाचे प्रमाण ५० कोटींपर्यंत खाली आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. अर्थात अशाही स्थितीत यंदाच्या आर्थिक वर्षी वाणिज्य कर खाते अडिच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण महसूल प्राप्त करील. गतवर्षीही या खात्याने आपले लक्ष्य गाठले होते. सध्या उद्योगांपैकी जुवारी उद्योगाकडून या खात्याला सर्वाधिक म्हणजे सुमारे पावणे तीनशे कोटींचा महसूल मिळतो. अगोदर नाफ्त्यावर आयात कर मिळत होता. आता जुवारी नाफ्त्याऐवजी ‘गेल’चा वायू वापरत असल्याने पावणे तीनशे कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा होतात. (खास प्रतिनिधी)