शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मये विधेयक सरकारकडे परत

By admin | Updated: July 8, 2014 01:19 IST

पणजी : मयेतील स्थलांतरितांच्या मालमत्तेबाबत गोवा विधानसभेने मंजूर केलेले विधेयक (अ‍ॅबोलिशन आॅफ प्रोप्राईटरशिप्स टायटल्स अ‍ॅण्ड ग्रँट्स आॅफ लँड्स बिल-२०१४) मावळते

पणजी : मयेतील स्थलांतरितांच्या मालमत्तेबाबत गोवा विधानसभेने मंजूर केलेले विधेयक (अ‍ॅबोलिशन आॅफ प्रोप्राईटरशिप्स टायटल्स अ‍ॅण्ड ग्रँट्स आॅफ लँड्स बिल-२०१४) मावळते राज्यपाल भारत वीर वांच्छू यांनी मंजुरी न देता गोवा सरकारकडे परत पाठवले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे राज्यपालांनी काही शंकांबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. ही माहिती स्वत: राज्यपालांनी दिली. राज्यपालांनी हे विधेयक गोवा विधानसभेकडे फेरविचारार्थ पाठविलेले नाही. त्यांनी थोडी वेगळी भूमिका घेत काही शंका नमूद केल्या आहेत. शंकांचे निरसन करण्यासाठी हे विधेयक मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे म्हणजे सरकारकडे परत पाठवले आहे. त्यामुळे विधेयक विधानसभेसमोर पुन्हा नेण्याची सरकारला गरज नाही. वांच्छू यांच्याजवळ विधेयक बरेच दिवस राहिले. त्यांनी कायदेशीरदृष्ट्या विधेयकाचा अभ्यास केला. शेवटी काही शंका उपस्थित झाल्यानंतर त्या सरकारला कळविल्या आहेत. सरकार शंकांबाबत नव्या राज्यपालांना कदाचित स्पष्टीकरण देईल किंवा आहे त्याच स्थितीत नव्या राज्यपालांकडून विधेयक मंजूरही करून घेईल. मयेतील स्थलांतरित मालमत्तेचे अधिकार मयेतील लोकांना आम्ही देत आहोत व त्यासाठीच संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याच्या धर्तीवर अ‍ॅबोलिशन आॅफ प्रोप्राईटरशिप्स टायटल्स अ‍ॅण्ड ग्रँट्स आॅफ लँड्स हे विधेयक आणल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मयेतील जागेमध्ये काही खनिज व्यावसायिकांचाही इंटरेस्ट आहे. अर्थात, राज्यपालांच्या ते लक्षात आले होते की नाही हे स्पष्ट झालेले नाही. गोवा मुक्त झाला असल्याने मयेतील स्थलांतरित मालमत्तेला पोर्तुगीज कायदा लागू होत नाही. तथापि, मयेसंबंधी गोवा सरकारच्या या विधेयकास पोर्तुगाल सरकारने आक्षेप घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी आणि मयेतील लोकांनी एकत्र येऊन पोर्तुगालचा निषेध केला होता. तसेच त्यांनी राज्यपाल वांच्छू यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते. वांच्छू यांनी या विधेयकास मंजुरी द्यावी, अशी विनंती स्वातंत्र्यसैनिकांनी केली होती. (खास प्रतिनिधी)