शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

भालचंद्र नाईक यांचा चार तास जबाब

By admin | Updated: July 3, 2014 01:18 IST

पणजी : राणे पिता-पुत्रांवर दहा कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करणारे दहेज मिनरल्स खाण कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र नाईक

पणजी : राणे पिता-पुत्रांवर दहा कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करणारे दहेज मिनरल्स खाण कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र नाईक यांचा एसआयटी अधिकाऱ्यांनी पोलीस उपमहानिरीक्षक के. के. व्यास यांच्या उपस्थितीत बुधवारी सुमारे चार तास जबाब घेण्यात आला. खाण घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थापन झालेल्या एसआयटीने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. भालचंद्र नाईक हे आपल्या आरोपांशी ठाम आहेत. आपल्या एका खाण प्रकरणात लिज परवाना देण्यासाठी राणे पिता-पुत्रांनी वरील लाच मागितल्याचा तसेच आधी आपण ६ कोटी रुपये त्यांना दिल्याचा भालचंद्र यांचा आरोप आहे. उपमहानिरीक्षक व्यास यांनी त्यांना मंगळवारी समन्स बजावले होते. त्यानुसार दुपारी ३ वाजता ते दोनापावल येथे एसआयटी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. तेथून उपअधीक्षक निळू राऊत देसाई यांनी त्यांना पोलीस मुख्यालयात आणले. मला पोलिसांना समन्स काढले. त्यामुळे उपस्थित राहणे भाग होते, असे नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पत्रकार परिषदेत आपण जे आरोप केले, त्यावर आपण ठाम आहे आणि तेच एसआयटी अधिकाऱ्यांनाही सांगितले असल्याचे ते म्हणाले. नाईक यांनी काँग्रेस भवनातून प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते तसेच त्यांचे पुत्र आमदार विश्वजीत राणे यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान, नाईक हे आपल्या आरोपांशी ठाम राहिल्यास राणे पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हे नोंदविले जातील, असे व्यास यांनी मंगळवारी जाहीर केले होते. त्यामुळे आता या दोघांविरुद्ध गुन्हे नोंदविले जातात काय, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी केला आहे. राणे यांनी या प्रकरणी भालचंद्र यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला घालण्याचा इशारा दिलेला आहे. दरम्यान, आपण तक्रार मागे घ्यावी, यासाठी दबाव येत असल्याचे नाईक यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती मिळाली आहे. (प्रतिनिधी)