मंत्रिपदासाठी बाबूशची थेट पर्रीकरांकडे धाव!

By Admin | Updated: June 26, 2015 01:45 IST2015-06-26T01:45:10+5:302015-06-26T01:45:36+5:30

पणजी : मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आमदार बाबूश मोन्सेरात जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यांनी गुरुवारी सकाळी दिल्लीत संरक्षणमंत्री व ज्येष्ठ भा

Babu's direct run for Parrikar | मंत्रिपदासाठी बाबूशची थेट पर्रीकरांकडे धाव!

मंत्रिपदासाठी बाबूशची थेट पर्रीकरांकडे धाव!

पणजी : मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आमदार बाबूश मोन्सेरात जोरदार
प्रयत्न करत आहेत. त्यांनी गुरुवारी
सकाळी दिल्लीत संरक्षणमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते मनोहर पर्रीकर यांची भेट
घेतली. मात्र, मोन्सेरात यांना मंत्रिमंडळात घेण्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर
हे मुळीच तयार नाहीत.
पर्रीकर गोव्यात येतात, तेव्हाही मोन्सेरात त्यांना भेटत असतात. मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याशी त्यांची अजून तरी दोस्ती नाही. तथापि, आपण पर्रीकर यांच्याकडे मंत्रिपदाविषयी चर्चा केलेली नाही, असे बाबूशचे म्हणणे आहे. आपल्या सांताक्रुझ व पत्नी जेनिफर मोन्सेरात यांच्या ताळगाव मतदारसंघात विकासकामे व्हायला हवीत. आपल्याला पर्रीकर यांनी विकासकामे करण्याचा शब्द दिला होता. पार्सेकर यांना विकासकामे जलदगतीने करण्यास सांगा, अशी विनंती आपण पर्रीकर यांना केल्याचे मोन्सेरात म्हणाले. (खास प्रतिनिधी)

Web Title: Babu's direct run for Parrikar