शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात महिलेला मंत्रिपद दिले जाईल! मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 08:54 IST

नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाला विरोध केल्याने 'काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर टीकेची झोड

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्याच्या मंत्रिमंडळात भविष्यात नक्कीच महिलांना स्थान मिळेल. माझ्या सरकारच्या गेल्या कार्यकाळात मंत्रिमंडळात महिला मंत्री होती. याबाबत विचार करता येईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर बोलताना त्यांनी रवी नाईक यांच्या निधनाने रिक्त झालेले मंत्रिपद नक्कीच भरणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार दिव्या राणे उपस्थित होत्या.

मंत्रिमंडळात सध्या एक मंत्रिपद रिक्त आहे. या जागी महिला आमदाराला स्थान मिळू शकते का? या प्रश्नावर सावंत सावंत बोलत होते. पत्रकारांच्या अन्य एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की महिला आरक्षण झाल्यास मी माझा मतदारसंघ त्यागण्यास अजूनही तयार आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे व याबद्दल कोणीही कसलाही किंतू मनात बाळगण्याचे कारण नाही.'

महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मोदी सरकारने संसदेत आणलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाला विरोध केल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 'इंडिया अलायन्स'चा कडक शब्दांत निषेध केला. काँग्रेसवर थेट निशाणा साधत हा राष्ट्रविरोधी पक्ष आहे, असे ते म्हणाले.

पत्रकार परिषदेस भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, महिलाध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर व इतर महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना सावंत यांनी 'इंडिया' आघाडीवर जोरदार टीका करत ही आघाडी राष्ट्रविरोधी आणि महिलाविरोधी असल्याचा आरोप केला. विधेयकाला विरोध करणारे सपा, तृणमूल, द्रमुक, आदी पक्षांचाही त्यांनी निषेध केला.

सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली आहेत. विधानसभा तसेच संसदेत महिलांना आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी 'नारी शक्ती वंदन अधिनियम' हे त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल होते. मात्र, विरोधकांनी या विधेयकाला विरोध करून महिलांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण केला. देशाच्या हिताचे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठीचे प्रत्येक निर्णय विरोधकांनी अडवण्याचा प्रयत्न केला.

विधेयकावरून विरोधकांवर टीका

मुख्यमंत्री म्हणाले की, 'काँग्रेस हा राष्ट्रविरोधी पक्ष आहे. देशातील ७० कोटी महिलांचा जर कुणी विश्वासघात केला असेल, तर तो काँग्रेस आणि त्याच्या सहयोगी पक्षांनीच केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आजवर अनेक ठोस निर्णय घेतले आहेत.' काँग्रेसने देशाला महिला पंतप्रधान दिली, पण महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी महिला आरक्षण लागू करण्यात मात्र या पक्षाला अपयश आले. 

'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयक हे महिलांना राजकीय क्षेत्रात अधिक संधी देण्यासाठी महत्त्वाचा टप्पा होते. या विधेयकाला विरोध करून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी महिलांच्या हक्कांवर घाला घातला.

आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत; पण तरीही राजकीय निर्णयप्रक्रिया आणि कायदेनिर्मितीत त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही. महिला आरक्षण विधेयकाद्वारे ही कमी भरून निघाली असती. मात्र, विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. - आमदार दिव्या राणे.

महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी महिलांचा विश्वासघात केला आहे. काँग्रेसने यापूर्वीही अशा विधेयकांना विरोध केला होता. त्यामुळे महिलांच्या हक्कांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट होते. - दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष 

English
हिंदी सारांश
Web Title : Woman minister post in future: Chief Minister Pramod Sawant

Web Summary : Goa's cabinet will likely include a woman minister in the future, says Chief Minister Pramod Sawant. He criticized the 'INDIA' alliance for opposing the women's reservation bill, calling them anti-women and anti-national. BJP supports women's empowerment, he stated, while opposition parties obstruct progress.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतWomen Reservationमहिला आरक्षण