शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजवण्यासाठी सरसावली ८० वर्षांची आजीबाई! स्वतः हातात फावडे घेऊन बुजवले खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:55 IST

'गांधीगिरी'ने दिले उत्तर

प्रशांत नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मडकई : विविध प्रकल्पांसाठी खोदलेले रस्ते व्यवस्थित न बुजवल्याने अशा रस्त्यांवरून ये-जा करताना लोकांची होणारी जीवघेणी कसरत एका आजीच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे ८० वर्षाच्या द्रौपदी नाईक या आजीने स्वतःच हातात फावडे घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. संबंधित कंत्राटदार व या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारभाराला मात्र ही चपराकच म्हणावी लागेल.

आडपई ते दुर्भाटपर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी या परिसरातील रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले. त्यानंतर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ठेकेदाराने रस्ते बुजवण्याचे काम अर्धवट ठेवल्याने लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

त्यांना काय वाटेल?

कंत्राटदार, अधिकाऱ्यांनी आपल्या कामाकडे डोळेझाक केली म्हणून आपण हातावर हात धरून फक्त नावे ठेवत बसायचे का? चतुर्थीचा सण तोंडावर आला आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणारी आपली मुले या सणासाठी जेव्हा गावात येतील तेव्हा गावातील रस्त्यांची ही अवस्था पाहून त्यांना काय वाटेल? असा उलट प्रश्नच द्रौपदी नाईक यांनी लोकांना विचारला आणि त्या पुन्हा खड्डे बुजविण्याच्या कामाला लागल्या.

श्रमदानाची चर्चा

द्रौपदी नाईक यांनी हातात फावडे घेऊन खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्यानंतर गावकऱ्यांनी प्रशासनावर टीका केली. त्याच वेळी आर्जीच्या कृतीची प्रेरणा घेऊन सरपंच, उपसरपंच, पंचायत मंडळ, गावातील सामाजिक संघटना, गणेश मंडळे यांनी एकत्रित येऊन श्रमदानातून गावातील रस्त्यांची डागडुजी करण्याची चर्चा सुरू झाली. यावेळी चतुर्थीपूर्वी गावातील रस्ते चकाचक करण्याचा मनोदय द्रौपदी नाईक यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPotholeखड्डे