होळी उत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर धावणार ६ विशेष गाड्या; पाहा, सविस्तर वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 08:19 IST2025-03-11T08:19:00+5:302025-03-11T08:19:44+5:30
कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

होळी उत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर धावणार ६ विशेष गाड्या; पाहा, सविस्तर वेळापत्रक
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : होळी उत्सवानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
गाडी क्र. ०११०२ मडगाव जंक्शन-पनवेल साप्ताहिक विशेष गाडी १५ मार्च आणि २२ मार्च रोजी मडगाव जंक्शन येथून सकाळी ८ वाजता सुटेल व त्याच दिवशी सायंकाळी ५:३० वाजता पनवेलला पोहोचेल. गाडी क्र. ०११०१ पनवेल-मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष १५ मार्च आणि २२ मार्च रोजी पनवेल येथून सायंकाळी ६:२० वाजता सुटेल.
गाडी क्र. ०११०१ पनवेल-मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष गाडी १५ मार्च आणि २२ मार्च रोजी सायंकाळी ६:२० वाजता पनवेल येथून निघेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ६:४५ वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. ही २० डब्यांची गाडी करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण स्टेशनवर थांबेल.
गाडी क्र. ०११०४ मडगाव जंक्शन-लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष गाडी मडगाव जंक्शन येथून १६ व २३ मार्च रोजी १६:३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ६:२५ वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०११०३ लोकमान्य टिळक (टी) मडगाव जं. साप्ताहिक विशेष गाडी १७ आणि २४ मार्च रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून ८:२० वाजता सुटेल व मडगाव जंक्शनला त्याच दिवशी २१:४० वाजता पोहोचेल. ही २० डब्यांची गाडी करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल व ठाणे स्थानकांवर थांबेल.
गाडी क्र. ०१०१८ चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमू विशेष १३ ते १६ मार्चपर्यंत चिपळूणहून दुपारी ३:२५ वाजता सुटेल व त्याच दिवशी रात्री २०:२० वाजता पनवेलला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०१७पनवेल-चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल १३ ते १६ मार्चपर्यंत पनवेलहून रात्री ११:१० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी २:०० वाजता चिपळूणला पोहोचेल. ८ डब्यांची ही गाडी अंजनी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेण स्टेशनवर थांबेल.