शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

४७० कोटींचा

By admin | Updated: June 12, 2014 01:27 IST

पणजी : पुंडलिकनगर-पर्वरी ते पणजीतील मडगाव-फोंडा सर्कलपर्यंत २.२ किलोमीटर लांबीचा नवा पूल ४७० कोटी खर्चून मांडवी नदीवर बांधला जाणार आहे.

पणजी : पुंडलिकनगर-पर्वरी ते पणजीतील मडगाव-फोंडा सर्कलपर्यंत २.२ किलोमीटर लांबीचा नवा पूल ४७० कोटी खर्चून मांडवी नदीवर बांधला जाणार आहे. या पुलाचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, पणजीतील वाहतुकीच्या कोंडीची समस्या यामुळे बरीच निकालात निघेल. मांडवी नदीवर सध्या असलेल्या दोन पुलांच्या मधून हा तिसरा नवा पूल येईल. तो दोन्ही पुलांच्या तुलनेत पंधरा मीटर उंचीवर असेल. पुलाचा मांडवी नदीवरील भाग ६00 मीटर लांबीचा असेल. नवा पूल चौपदरी असेल व त्यासाठी वन खाते, बंदर कप्तान, सीझेडएम आदी सर्व यंत्रणांची मान्यता मिळाली आहे. पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम दि. १५ सप्टेंबरपर्यंत सुरू होईल. मुख्यमंत्री म्हणाले की, पुंडलिकनगर सर्कलहून सुरू होणारा चौपदरी पूल मुंबईला जाणाऱ्या बसगाड्या जिथे थांबतात, त्या स्थानकापर्यंत येईल. त्यानंतर या पुलाची दिशा मडगावला जाणाऱ्या मार्गाच्या दिशेने नेली जाईल. मडगाव-फोंडा सर्कलला पुलाचा शेवट असेल. फोंड्याच्या दिशेने उड्डाणपूल बांधला जाईल. गुरुवार दि. १२ जूनपर्यंत कंत्राटदार कंपनीच्या हाती कामाचा आदेश दिला जाईल. नव्या पुलावर रंगीत विद्युत रोषणाई केली जाणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या शनिवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुलाची पायाभरणी केली जाईल; पण हा कार्यक्रम सायंकाळी साडेचारच्या सुमारास कला अकादमीत होणार आहे. मांडवीच्या बाजूने कार्यक्रम करायला गेल्यास वाहतुकीची कोंडी होईल व सुरक्षेबाबतही प्रश्न निर्माण होईल. मांडवी पूल नेमका कसा असेल, याचे सादरीकरण त्या दिवशी कला अकादमीत लोकांना पाहायला मिळेल. मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर दिल्लीबाहेर येऊन गोव्यात प्रथमच कार्यक्रम करत आहेत. (खास प्रतिनिधी)