शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ‘फ्रेंडशिप डे’ आधीच गमविला मित्र; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

By पंकज शेट्ये | Updated: August 4, 2024 14:56 IST

वास्को महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय संज्योत बोरकर याचा मृत्यू झाला

वास्को:  ‘फ्रेंडशिप डे’ सुरू होण्याच्या आधीच शांतीनगर, वास्को महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय संज्योत बोरकर याचा मृत्यू झाला असून त्याचे दोन मित्र जखमी झाले. संज्योतचा मित्र डेवीड क्रुज (वय २०) भरधाव वेगाने चारचाकी घेऊन दाबोळी विमानतळाच्या दिशेने जाताना त्याचा ‘स्टीअरिंग’ वरील ताबा सुटून चारचाकी रस्त्याबाहेर जाऊन वरून खाली कोसळली. त्या अपघातात डेवीड क्रुज आणि २४ वर्षीय सहर्ष भोसले गंभीर जखमी झाल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली.

वास्को पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री ११.२० वाजता भीषण अपघात घडला. संज्योत बोरकर (रा: नोनमोन - वास्को), डेवीड क्रुज (रा: खारीवाडा - वास्को) आणि सहर्ष भोसले (रा: नोनमोन - वास्को) हे तिघेही चांगले मित्र आहेत. रात्री तिघेही चारचाकीने शांतीनगर महामार्गावरून दाबोळी विमानतळाच्या दिशेने जात होते. भरधाव वेगाने डेवीड शांतीनगर महामार्गावरून चारचाकी (क्र: जीए ०१ इ ६३९८) चालवत जाताना अचानक त्याचा ‘स्टीअरींग’ वरील ताबा सुटला. ताबा सुटल्यानंतर चारचाकी रस्त्याबाहेर जाऊन वरून खाली कोसळून तेथे असलेल्या घराजवळ थांबली. 

अपघात एवढा भयंकर होता की चारचाकीचा चक्काचूर झाला. अपघात घडल्याचे तेथे राहणाऱ्यांना समजताच त्यांनी त्वरित तेथे येऊन चारचाकीत जखमी झालेल्या तिनही युवकांना बाहेर काढले. तसेच त्यांना उपचारासाठी त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. अपघातामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर तेथून बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात नेण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या तिनही युवकांना इस्पितळात नेले असता संज्योतचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातात सापडलेल्या चारचाकी चालक डेवीड याच्यावर उपचार करून त्याला घरी पाठवल्याची माहीती मिळाली. 

अपघातात जखमी झालेला तिसरा मित्र सहर्ष हा गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू असल्याची माहीती पोलीसांनी दिली. अपघात एवढा भिषण होता की त्यात जखमी झालेल्या युवकांना बाहेर काढण्यासाठी चारचाकीचा दरवाजा तोडावा लागला अशी माहीती मिळाली. पोलीसांना अपघाताची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. अपघातात मरण पावलेल्या संज्योत च्या मृतदेहावर रविवारी (दि.४) शवचिकीत्सा केल्यानंतर मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. अपघातात सापडलेल्या त्या चारचाकीच्या काचा एकदम काळ्या (टींन्टड) होत्या अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

अपघातात मरण पावलेला १९ वर्षीय संज्योत एका ‘पेंन्ट’ दुकानावर कामाला होता अशी माहीती मिळाली. त्याला दोन भाऊ असून त्याच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटूंबिय, मित्र परिवारावर दु:ख्खाचा डोंगर कोसळला आहे. वास्को पोलीस त्या अपघात प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात