शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही फक्त बियाणे निवडा, वाण आमच्या मताने देऊ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

राज्य शासनाच्या आपले सरकार महाडीबीटी पाेर्टलवर सुटीवरील बियाणे प्राप्त करण्यासाठी नाव नाेंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शेतकरी पाेर्टलला ऑनलाइन भेट देऊन फाॅर्म भरून नावाची नाेंदणी करीत आहेत. या पाेर्टलवर खरिपातील विविध पिकांच्या बियाण्यांची नाेंद आहे. गडचिराेली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. त्यामुळे शेतकरी धान बियाण्यांसाठी विविध वाणांची निवड करीत आहेत.

गाेपाल लाजूरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी कृषी विभागाकडून ५० टक्के सुटीवरील बियाणे उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पाेर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागताे. अर्ज मंजूर झाल्यानंतर शासनाने ठरविलेल्या अधिकृत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना परवान्यासह बियाणे खरेदी करावे लागते; परंतु ऑनलाइन पाेर्टलवर निवडलेली बियाणी शेतकऱ्यांना मिळतीलच याची शाश्वती नसते. ‘तुम्ही फक्त बियाणे निवडा, वाण आमच्या मताने देऊ !’ असाच प्रकार शेतकऱ्यांसाेबत दरवर्षी घडताे. राज्य शासनाच्या आपले सरकार महाडीबीटी पाेर्टलवर सुटीवरील बियाणे प्राप्त करण्यासाठी नाव नाेंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शेतकरी पाेर्टलला ऑनलाइन भेट देऊन फाॅर्म भरून नावाची नाेंदणी करीत आहेत. या पाेर्टलवर खरिपातील विविध पिकांच्या बियाण्यांची नाेंद आहे. गडचिराेली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. त्यामुळे शेतकरी धान बियाण्यांसाठी विविध वाणांची निवड करीत आहेत. त्याखालाेखाल कापूस, साेयाबीन तसेच तूर, तीळ पिकांच्या वाणांचीही निवड शेतकरी करीत आहेत. मागील वर्षी पाेर्टलवर जे वाण हाेते, तेच वाण याही वर्षी आहे. परंतु संपूर्ण वाण विक्रेत्यांकडे उपलब्ध राहत नाही. केवळ जाड प्रतीचे माेजके वाण विक्रेत्यांकडे उपलब्ध असते. मागील वर्षी शेतकऱ्यांसाेबत हा प्रकार माेठ्या प्रमाणात घडला. आपल्याकडे असलेले वाण शेतकऱ्यांना देऊन माेकळे करण्यात आले. हा प्रकार याहीवर्षी घडून शेतकऱ्यांची दिशाभूल हाेण्याची शक्यता आहे.

बियाणे मिळण्याची शाश्वती किती?कृषी विभाग व जिल्हा परिषदमार्फत पंचायत समिती अंतर्गत बियाण्यांचे वाटप केले जाते. परंतु  पंचायत समितीवरील बियाणे केव्हा उपलब्ध असतात, याबाबत शेतकऱ्यांना वेळीच माहिती मिळत नाही तर महाडीबीटीवर नाेंदणी करूनही आपल्या नंबर बियाण्यांसाठी लागणार की नाही, याची शाश्वती कमीच असते.

बारीक वाण देण्यास हाेते टाळाटाळ 

कृषी विभागाने ठरविलेल्या अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडे धानाचे बारीक वाण उपलब्ध असते. शेतकऱ्यांनी पाेर्टलवर निवडलेल्या वाणांची मागणी जेव्हा विक्रेत्यांकडे केली जाते, तेव्हा त्यांच्याकडून नकार दिला जाताे. आपल्याकडे त्या धानाच्या जातीचे बारीक   वाण उपलब्ध नाही. जाड प्रतीचे वाण उपलब्ध आहे, असे सांगून बारीक वाण देण्यास टाळाटाळ केली जाते. परंतु गरजू शेतकरी याची वाच्यता कुठेही करीत नाही.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती