शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक आदिवासी दिन; डोंग्याने नदी ओलांडून २ कि.मी. पायी चालत आरोग्य कर्मचारी गेले गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 21:20 IST

जागतिक आदिवासी दिनानिमित्त (९ ऑगस्ट) प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसाअंतर्गत उपकेंद्र मवेली येथील नदीपलीकडील कुदरी गावाला तोडसाचे वैघकीय अधिकारी डॉ. राकेश नागोशे व आरोग्य कर्मचारी यांनी गावात जाऊन गावकऱ्यांची आरोग्य तपासणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जागतिक आदिवासी दिनानिमित्त (९ ऑगस्ट) प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसाअंतर्गत उपकेंद्र मवेली येथील नदीपलीकडील कुदरी गावाला तोडसाचे वैघकीय अधिकारी डॉ. राकेश नागोशे व आरोग्य कर्मचारी यांनी गावात जाऊन गावकऱ्यांची आरोग्य तपासणी केली.पावसाळ्यात कुदरी मोहुर्ली हेटळकसा ही तिन्ही गावे नदीपलीकडे असल्याने संपर्क तुटल्याने तेथे पोहचण्यास कसरत करावी लागते. गावकऱ्यांनी बनविलेल्या गावठाण डोंग्याने नदी ओलांडून तसेच २ किमी पायी प्रवास करुन आरोग्य कर्मचारी गावात गेले.

शेतात हंगाम करणारे नागरिक पोलो साजरा करत असल्याने गावातील सर्व लोकसंख्या तपासणी होईल या उद्देशाने गावाला भेट देण्यात आली. आज कुदरी येथील १० गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ गरोदर मातांमधे तीव्र रक्तक्षयाची लक्षणे आढळल्याने त्यांना त्वरीत रक्त चढविण्याकरीता अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्याच्या सुचना आरोग्य कर्मचाºयांना देण्यात आल्या. तसेच गरोदर मातांना नियमित आहाराबाबत व संस्थेत प्रसुती करण्याकरीता समुपदेशन करण्यात आले. अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व ज्येष्ठ नागरिकांच्या बिपी, शुगर, मुख कर्करोग तपासणी करुन आरोग्य सल्ले देण्यात आले. सोबत आरोग्य सेवक गजानन वावरे उपस्थित होते.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना