शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक आरोग्य संघटनेने केला लोकबिरादरी प्रकल्पाचा सन्मान

By admin | Updated: April 9, 2017 01:27 IST

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मागील ४३ वर्षांपासून आरोग्य सेवेचे उत्तम काम करणाऱ्या डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला

भामरागड : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मागील ४३ वर्षांपासून आरोग्य सेवेचे उत्तम काम करणाऱ्या डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला जागतिक आरोग्य संघटनेने पब्लिक हेल्थ कॅम्पेन अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे. डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचे पुत्र डॉ. दिगंत आमटे व डॉ. अनघा दिगंत आमटे यांनी शुक्रवारला नवी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते, अनुप्रिया पटेल, जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी हेंक बेकेडम आदी मान्यवर उपस्थित होते. २३ डिसेंबर १९७३ ला समाजसेवक बाबा आमटे यांनी भामरागड तालुक्यातील हेमलकसा या दुर्गम गावात एका गवताच्या झोपडीतून लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात केली. तेव्हापासून बाबा आमटे यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी या प्रकल्पाद्वारे गोरगरीब आदिवासींच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. जवळपास ४३ वर्षांपासून आमटे दाम्पत्य जंगलव्याप्त, नक्षलग्रस्त व मुलभूत सुविधांचा अभाव असलेल्या हेमलकसा येथे आदिवासींना आरोग्यविषयक सेवा देत आहेत. गेल्या काही वर्षांपासून डॉ.दिगंत प्रकाश आमटे व डॉ. अनघा दिगंत आमटे हेही सेवाकार्यात रममाण झाले आहेत. २०१६ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आमटे दाम्पत्यास त्यांनी केलेल्या अविरत सेवेबद्दल डी.लीट. पदवी देऊन गौरव केला होता. आता जागतिक आरोग्य संघटनेनेही लोकबिरादरी प्रकल्पास सन्मानित केल्याने आमटे दाम्पत्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. (तालुका प्रतिनिधी)