शहरं
Join us  
Trending Stories
1
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
2
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
3
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
4
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
5
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
6
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
7
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
8
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
11
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
12
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
13
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
14
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
15
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
16
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
17
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
18
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
19
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरीची कामे मंदावली

By admin | Updated: May 30, 2015 02:01 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहीर व इनवेल बोरिंगची कामे

गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहीर व इनवेल बोरिंगची कामे पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मंदाविली आहेत. सिंचन विहिरींचे काम तातडीने करून घेण्यासाठी शेकडो लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात वारंवार चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने ३१ मे २०१५ पूर्वी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर व इनवेल बोरिंगची कामे पूर्ण करण्याचे निर्देश सर्व १२ पंचायत समित्यांना दिलेले आहेत. सदर कामे पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी जि.प. प्रशासनाने सिंचन विहीर व इनवेल बोरिंगच्या कामासाठी अ‍ॅडव्हॉन्स म्हणून अग्रीम रक्कमही मंजूर केली आहे. मात्र पंचायत समिती, ग्रामपंचायत व कंत्राटदारांमध्ये समन्वय नसल्याने सिंचन विहिरींच्या कामात गती नसल्याचे दिसून येत आहे.
सन २००८-०९ पासून तर २०१४-१५ पर्यंत नरेगा अंतर्गत जिल्ह्यात एकूण ३ हजार ९० सिंचन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. यापैकी ९५१ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाले आहे तर १२८० कामे सुरू आहेत. जवळपास ७०० विहिरी अपूर्णावस्थेत आहे. दगड लागल्यामुळे जिल्ह्यातील २६ सिंचन विहिरींचे काम बंद पडले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
सिंचन सुविधेवर परिणाम होणार
नरेगा अंतर्गत जिल्ह्यातील सिंचन विहिरींचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे जिल्ह्यातील जवळपास ५०० सिंचन विहिरींचे काम अपूर्ण राहणार आहे. तर २०० हून अधिक सिंचन विहिरींचे इनवेल बोरिंगचे काम शिल्लक राहणार आहे. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात सिंचन सुविधेवर परिणाम होणार असून लाभार्थी शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित राहणार असल्याची शक्यता आहे.
२०० हून अधिक विहिरी इनवेल बोरिंगच्या प्रतीक्षेत
नरेगा अंतर्गत २०१४-१५ या वर्षापासून २ लाख ९० हजार रूपयांच्या अनुदानातून सर्व प्रवर्गाच्या शेतकरी लाभार्थ्यांना सिंचन विहिरींचा लाभ दिल्या जातो. यामध्ये सिंचन विहिरीच्या खोलीच्या खाली साधारणत: १०० फूट अंतरापर्यंत इनवेल बोअर मारल्या जाते. मात्र पंचायत समिती व ग्रा.पं. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पूर्ण झालेल्या जवळपास २०० सिंचन विहिरी इनवेल बोरिंगच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे.
कंत्राटदार म्हणतो, आधी अ‍ॅडव्हान्स द्या
नरेगा अंतर्गत पूर्ण झालेल्या सिंचन विहिरीला इनवेल बोअर मारण्यासाठी जि.प. प्रशासनाने अग्रीम रक्कम मंजूर केली आहे. सदर रक्कम संबंधित ग्रामपंचायतीच्या खात्यात वळते करण्यात आले आहे. यातून ग्रा.पं. प्रशासन, ग्रामसेवक व लाभार्थ्यांनी खासगी कंत्राटदाराकडून इनवेल बोअरचे कामे पूर्ण करून घ्यावीत, असे जि.प. प्रशासनाचे निर्देश आहे. मात्र सदर काम करून घेण्यासाठी कंत्राटदार आधी अ‍ॅडव्हॉन्स द्या, त्यानंतर काम करतो, असे म्हणत आहे. त्यामुळे इनवेल बोअरची कामे थंडबस्त्यात आहे.