शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

धानोरातील उद्यानाचे काम वर्षभरापासून अपूर्ण

By admin | Updated: March 5, 2017 01:26 IST

धानोरा येथील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाचे काम सामाजिक वनिकरण विभाग गडचिरोलीच्या वतीने वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले.

लाखो रूपयांचा खर्च : स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान अलाउद्दीन लालानी  धानोरा धानोरा येथील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाचे काम सामाजिक वनिकरण विभाग गडचिरोलीच्या वतीने वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले. या उद्यानातील कामांवर आतापर्यंत लाखो रूपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र या उद्यानातील रोपटे कोमेजली असून येथे अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. वर्षभरापासून या उद्यानाचे काम अपूर्ण आहे. परिणामी या उद्यानाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप धानोरावासीयांकडून होत आहे. ज्या गावाकडे गावालगत किमान एक एकर (४० आर) सलग क्षेत्र उपलब्ध असेल अशा गावांमध्ये उद्यानाची सदर योजना राबविण्यात येते. ज्या गावामध्ये गावालगत शासकीय पडिक जमीन उपलब्ध आहे, अशा जमिनीचे सौंदर्यीकरण करून विकास करणे हे या योजनेत अभिप्रेत आहे. जैवविविधता उद्यानात वृक्ष लागवड करणे, उद्यान निर्मिती, लहान मुलांना मनोरंजनासाठी व ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी तसेच विश्रांती घेण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षीत आहे. नक्षत्रवन, औषधी वनस्पती लागवड, स्थानिक जैवविविधता संवर्धन करणे, खेळणी बसविणे, कारंजे निर्मिती आदी कामे या उद्यानात प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र शासनाकडून निधी प्राप्त होऊनही धानोराच्या सदर उद्यानात अंदाजपत्रकानुसार कामे होताना दिसून येत नाही. सामाजिक वनिकरण विभाग गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने या जैवविविधता उद्यानाचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. जैवविविधता उद्यानात झुले पाळणा, घसरपट्टी यावर सहा ते सात लाख रूपये खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर खर्च बाजारभावाप्रमाणे तीन लाख रूपये आहे. झुले लावल्यानंतर चौथ्या दिवशी येथील एक झुला तुटून पडला. त्यामुळे या उद्यानात खेळणाऱ्या काही मुलांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी सौरदिवे अद्यापही लावण्यात आले नाही. मार्च २०१६ मध्ये खर्च झाल्याचा कागदोपत्री रेकॉर्ड तयार करण्यात आला आहे. सदर कामाची ई-निविदा काढण्यात आली नाही. या उद्यानाला मुख्य प्रवेशद्वार आहे. मात्र याला अद्यापही दरवाजे लावण्यात आले नाही. वर्षभरापूर्वीच प्रवेशद्वारासह सर्व बाबींच्या खर्चाचे बिल काढण्यात आले. सदर उद्यानात १० ते १२ ब्रास मुरूम टाकून तो रस्त्यावर पसरविण्यात आला. मात्र या मुरूमाची रॉयल्टी काढण्यात आली नसून ई-टेंडरींग करण्यात आली नाही. उद्यान निर्मितीपूर्वी येथे जंकासचे बिट आगार होते. त्यावेळी येथे रस्ते तयार करण्यात आले होते. मात्र आता याच रस्त्यावर थातूरमातूर मुरूम टाकून लाखो रूपयांचे बिल काढण्यात आले आहे. उद्यानात झाडे लावण्यासाठी मजूर लावण्यात आले. मात्र या मजुराची डिसेंबर २०१६ च्या मजुरीची रक्कम अदा करण्यात आली नाही.