शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रीविरोधात महिलांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 01:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत सोनसरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या मोहगाव, खापरी गावातील महिलांनी कन्हारटोला येथील अवैध दारू विक्री बंद व्हावी, या मागणीला घेऊन कन्हारटोला गावात जनजागृती रॅली काढली. दारूविक्रेत्यांना नोटीस देऊन दारू विक्री बंद करण्यासाठी सांगितले. कन्हारटोलातील दारूविक्रीविरोधात दोन्ही गावातील महिला एकवटल्या.सोनसरी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया कान्हारटोला येथे दारू ...

ठळक मुद्देरॅली काढून विक्रेत्यांना दिली तंबी : कन्हारटोलातील दारूविक्री बंद करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत सोनसरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या मोहगाव, खापरी गावातील महिलांनी कन्हारटोला येथील अवैध दारू विक्री बंद व्हावी, या मागणीला घेऊन कन्हारटोला गावात जनजागृती रॅली काढली. दारूविक्रेत्यांना नोटीस देऊन दारू विक्री बंद करण्यासाठी सांगितले. कन्हारटोलातील दारूविक्रीविरोधात दोन्ही गावातील महिला एकवटल्या.सोनसरी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया कान्हारटोला येथे दारू विक्री सुरु आहे. आसपासच्या गावातील नागरिक तेथे येऊन दारू पीत आहेत. कन्हारटोलाची दारू बंद व्हावी यासाठी ८० ते १०० महिला एकवटल्या. त्यांनी बैठक घेतली व त्यानंतर गावातील दारू विक्रेत्यांना दारू विक्री थांबवण्यासाठी नोटीस दिली. महिलांच्या बैठकीमध्ये दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच महिलांनी गावात फेरी काढून सर्व दारूविक्रेत्यांना दारू विक्री न करण्याची तंबी दिली. गाव संघटनेतर्फे दारू विक्रेत्यांना पाच दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्या नंतर दारूविक्री केल्यास विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक, रमेश राऊत, मडावी व मुक्तिपथ कार्यकर्ते हजर होते.अनोखी गांधीगिरीजिल्ह्यात दारू विक्री करणाºया विक्रेत्यांमध्ये अनेक महिलाही आहेत. मोहगावातील एका दारूविक्रेतीला गावातील महिलांनी चक्क राखी बांधली आणि ‘बाई, दारू विकू नकोस’ असे आवाहन केले. महिलांनी केलेल्या या अनोख्या गांधीगिरीमुळे ती दारूविक्रेतीही अचंबित झाली. तसेच महिलांनी गावातील नागरिकांनाही राखी बांधून अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी