शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस नसल्याने रोवणी खोळंबली

By admin | Updated: July 15, 2015 01:53 IST

यंदा पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. पहिल्याच आगमनात पावसाच्या धारा संततधार राहिल्याने बळीराजाने पाऊस बंद झाल्यानंतर चिखलणी करून खरीप हंगामातील धानाची पेरणी केली.

धान पऱ्हे करपण्याच्या मार्गावर : शेताच्या बांध्या अद्यापही कोरड्याच
देसाईगंज : यंदा पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. पहिल्याच आगमनात पावसाच्या धारा संततधार राहिल्याने बळीराजाने पाऊस बंद झाल्यानंतर चिखलणी करून खरीप हंगामातील धानाची पेरणी केली. पेरणी होताच पावसाने १० ते १५ दिवस दडी मारल्यामुळे धान पीक करपण्याच्या मार्गावर होते. परंतु दोन दिवसांपुर्वी पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला असला तरी विसोरा परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान पऱ्हे रोवणीलायक होऊनही शेतातील बांध्यांमध्ये पाणी न साचल्याने रोवणीचा कालावधी निघून जात आहे. परिणामी शेतकरी बांधवांमध्ये चिंता पसरली असून रोवणीची कामे खोळंबली आहे. येत्या आठवड्याभऱ्यात पावसाचे आगमन दमदार न झाल्यास शेतकरी बांधवांची अडचण आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. आकाशाकडे टक लावून शेतकरीबांधव मुसळधार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. देसाईगंज तालुक्यासह देसाईगंज उपविभागातील बहुतांश भागात अशीच परिस्थिती असून शेतकरी कमालीचा हवालदील झाला आहे. अनेक भागात वाढत्या उष्णतामानामुळे पऱ्हे करपू लागल्याने शेतकऱ्यांची चिंताा वाढली आहे . (वार्ताहर)
भामरागडातही १५ दिवसांपासून पाऊस गायब
जून महिन्याच्या १५ तारखेला भामरागडात पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दडी मारली असून शेतकरी हवालदील झाला आहे. अनेक ठिकाणी पऱ्हे सुकून गेले असून काहींनी दुसऱ्यांदा पऱ्हे टाकले. परंतु ते अद्यापही उगवलेले नाही. जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. तेंदूपत्ता हंगाम संपून शेतकरी शेती मशागतीच्या कामासाठी लागला आहे. परंतु पाउस नसल्याने शेतकऱ्याची चिंंता वाढली आहे. त्यामुळे पाऊस जर आला नाही तर भामरागड तालुक्यात अनेक शेत्या यंदा रिकाम्याच राहण्याची शक्यता आहे.