शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

शहरातील पाणीपट्टी होणार दुप्पट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पाणी पुरवठ्यावर होणाऱ्या खर्चाची तुट भरून काढण्यासाठी यावर्षी पाणीपट्टीत जवळपास दुप्पट म्हणजेच १ हजार ...

ठळक मुद्देगडचिरोलीवासीयांवर वाढीव भुर्दंड : २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ११०० रुपये वाढीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पाणी पुरवठ्यावर होणाऱ्या खर्चाची तुट भरून काढण्यासाठी यावर्षी पाणीपट्टीत जवळपास दुप्पट म्हणजेच १ हजार १०० रूपये प्रती वर्ष प्रती जोडणी वाढ करण्याचा विचार नगर परिषद करीत आहे. याबाबतचा मुद्दा २०२०-२१ च्या नियोजित अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तावित वाढीस स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने मंजूरी दिल्यास नागरिकांना प्रती जोडणी प्रती वर्ष २ हजार ४०० रूपये पाणी कर भरावा लागणार आहे.गडचिरोली शहराला नगर परिषदेमार्फत पाणी पुरवठा केला जातो. गडचिरोली शहरात एकूण ७ हजार ५७६ नळ जोडण्या आहेत. शहरात एकूण सात पाण्याच्या टाक्या आहेत. ज्या नागरिकांकडे नळ आहे. त्यांच्याकडून स्वतंत्र पाणी कर वसूल केला जातो. सध्या प्रती वर्ष प्रती जोडणी १ हजार ३०० रूपये पाणी कर आकारला जात आहे. यातून नगर परिषदेला वार्षिक जवळपास ९९ लाख रूपयांचा कर मिळते. मात्र वर्षभरात पाणी पुरवठ्यावर होणार खर्च जवळपास दुप्पट आहे. २०१९-२० या वर्षात मार्च पर्यंत पाणी पुरवठ्यावर जवळपास अडीच कोटी रूपये खर्च होणार आहेत. वसूल होणाऱ्या करापेक्षा खर्च अधिक असल्याने नगर परिषेला पाणी पुरवठ्यात दरवर्षीच तोट्याचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी पाणी पुरवठ्यावरील खर्च वाढतच चालला आहे. त्यामुळे तोट्यात वाढच होणार आहे. हा खर्च भरून काढणे आवश्यक असल्याने पाणीट्टीत यावर्षी १ हजार १०० रूपये वाढ करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे.नियोजीत अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर अर्थसंकल्पातील विषयांना सर्वप्रथम नगर परिषदेच्या स्थायी समितीची व नंतर सर्वसाधारण सभेची मंजूरीची आवश्यकता राहते. १ हजार १०० रूपये सुचविण्यात आलेली वाढ खूप अधिक असल्याने त्यावर तोडगा निघून वाढीत कपात होण्याची शक्यता आहे. मात्र पाणी पुरवठ्यावर वाढत चालेला खर्च लक्षात घेतला तर करात वाढ होण्याची शक्यता आहे. कर वाढ करतानाच नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध करणेही गरजेचे आहे.नगराध्यक्षासाठी वाहन खरेदी१५ दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष यांच्या वाहनाचा खर्च म्हणून नऊ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले. याला सर्वसाधारण सभेत काही सदस्यांनी विरोध केला. नगराध्यक्षांच्या खासगी वाहनासाठी नऊ लाख रुपये खर्च होत असतील तर त्याऐवजी नगर परिषदेने स्वतंत्र वाहन खरेदी करावे, अशी भूमिका काही नगरसेवकांनी मांडली होती. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यासाठी नगर परिषद एक वाहन खरेदी करणार आहे. त्यासाठी नऊ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात आहे. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत कोणता निर्णय घेतला जातो, यावर वाहन खरेदी अवलंबून आहे.दोन गुंड पाण्यासाठी २४०० रूपये परवडणार काय?पाणी कराच्या तुलनेत पाणी पुरवठ्यावरील खर्च जवळपास दुप्पट असल्याचे नगर परिषदेचे म्हणणे आहे. मात्र शहरातील काही वॉर्डांमध्ये दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होतो. त्यातही उंचावर व पाणी टाकीपासून दूर असलेल्या लांजेडा, स्नेहनगर, विसापूर व शहरातील इतर काही वॉर्डांमध्ये एक ते दोनच गुंड पाणी पाणी मिळते. या वॉर्डातील नागरिकांना वार्षीक २ हजार ४०० रूपये देणे परवडेल काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बहुतांश नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणी घेतली आहे. पूर्वी पिण्याच्या पाण्याला नळाच्या पाण्याशिवाय पर्याय नव्हता आता मात्र खासगी व्यावसायीकांचे आरओचे पाणी हा पर्याय उपलब्ध झाला आहे. २० लीटर पाण्याची कॅन २० रूपयांमध्ये घर पोहोचता उपलब्ध करून दिली जाते. ज्या नागरिकांना दिवसाला एक ते दोनच गुंड पाणी मिळते असे नागरिक नळ बंद करून आरओच्या पाण्याचा पर्याय निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या पाणी पुरवठा व्यवस्थेवर अनेक नागरिकांची नाराजी आहे.जुनीच यंत्रणावैनगंगा नदीवर असलेल्या पंपाची पाणी क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे फिल्टरपर्र्यत कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो. कधी कधी तर सातही पाण्याच्या टाक्या पूर्ण भरत नाही. असमान वितरण, टिल्लू पंपांचा वाढलेला वापर, नळांना तोट्या नसने आदी गंभीर समस्या पाणी वाटपात आहेत. या समस्यांमुळे काही वॉर्डांमध्ये रात्रंदिवस पाण्याचा अपव्यय होतो. तर काही वॉर्डातील नागरिकांना दोन गुंड पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाणी कर वाढवितांनाच प्रत्येक नळधारकाला पुरेसे व शुद्ध पाणी मिळेल याची खबरदारी घेणे आवश्क आहे. अन्यथा नळ जोडणी बंद करून कॅनच्या पाण्याचा पर्याय स्विकारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Waterपाणी