शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाने मला काय दिले रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST

अनेक गृहिणीसुद्धा कोणत्या वस्तू स्वस्त होणार, दैनंदिन वापरातील वस्तूंपासून ते गॅस सिलिंडरच्या किमती कमी होणार का, असा प्रश्न करत ...

अनेक गृहिणीसुद्धा कोणत्या वस्तू स्वस्त होणार, दैनंदिन वापरातील वस्तूंपासून ते गॅस सिलिंडरच्या किमती कमी होणार का, असा प्रश्न करत टीव्हीपुढे बसल्या होत्या; पण गृहिणींचे फारसे समाधान झाले नसल्याचे दिसून आले.

धोरणात्मक विकास व सामाजिक उत्तरदायित्व जोपासणारे अंदाजपत्रक आहे. अतिरंजित आकडेमोड न करता आरोग्य, शेती, छोटे व्यावसायिक यांना दिलासा मिळेल. परदेशी गुंतवणूक वाढून रोजगार निर्मितीस चालना मिळेल.

- ॲड. संदीप धाईत

कर व अर्थ सल्लागार

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून धान खरेदीसाठी भरीव निधी दिला आहे. सिंचनासाठी १० हजार कोटींची तरतूद केली आहे. आरोग्य सेवेसाठी निधीत भरीव वाढ केली आहे. शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे.

- अशोक नेते

खासदार, गडचिरोली

अर्थमंत्र्यांनी शेतकरी, छोटे व्यावसायिक, सुशिक्षित बेरोजगारांची निराशा केली. आकांक्षित जिल्ह्यासाठी वेगळी तरतूद असती तर विकासात्मक कामांना चालना मिळाली असती; पण सर्वांचा अपेक्षाभंग झाला आहे.

- अरविंद कात्रटवार

शिवसेना उपजिल्हा प्रमुख

ज्या देशाचं पोट महाराष्ट्रावर आहे, त्या महाराष्ट्राला या बजेटमध्ये काहीच मिळाले नाही. अनेक गोष्टींवर कृषी अधिभार लावण्यात आला. पेट्रोल-डिझेलचे दर अजून वाढणार आहेत. आयकरात कोणताही बदल नाही.

- भावना वानखेडे

जिल्हाध्यक्ष, महिला काँग्रेस

गॅसच्या किमती वाढतच आहेत. खायचे तेलही आवाक्याबाहेर गेले. सामान्य माणसाने या महागाईत जगावे तरी कसे? सरकारी पगारवाल्यांचे ठीक आहे. गोरगरिबांचा विचार करून काय ते निर्णय घेतले पाहिजे.

- कुसुम पाथोडे

गृहिणी, गडचिरोली

७५ वर्षेपेक्षा अधिक असणाऱ्याच नागरिकांना करात पूर्णपणे सूट दिली आहे. वास्तविक ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांनाच सूट देण्याची गरज आहे. आमदार-खासदारांप्रमाणे सेवानिवृत्तांनाही वैद्यकीय प्रतिपूर्ती द्यावी.

- देवाजी सोनटक्के

ज्येष्ठ नागरिक, गडचिरोली