शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

पऱ्हे करपण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 8, 2015 01:55 IST

मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली असल्याने धान पिकाचे पऱ्हे तसेच सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके करपायला लागली आहेत.

पावसाची २० दिवसांपासून दडी : बळीराजा हवालदिल; दुबार पेरणीची येणार पाळी
गडचिरोली : मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली असल्याने धान पिकाचे पऱ्हे तसेच सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके करपायला लागली आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
पावसाळ्याला सुरूवात होताच चार दिवस पावसाने थैमान घातले होते. पाऊस निघून गेल्यानंतर पेरणीला जोर आला. १ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १० हजार हेक्टरवर पेरणी झाली असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र जवळपास पेरण्या आटोपल्या आहेत. ७ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ४४२.९१ एवढा पाऊस पडला आहे.
मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. दिवसभर कडाक्याची ऊन पडत असल्याने जमिनीतील ओलावा नष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. परिणामी जमीन कडक होऊन धानाचे पऱ्हे करपायला सुरूवात झाली आहे. दुरून पऱ्हे हिरवेगार दिसत असले तरी कडक उन्हामुळे पाने गुंडाळण्यास सुरूवात झाली आहे. पुन्हा पाच ते सहा दिवस पाऊस न पडल्यास संपूर्ण पऱ्हे नष्ट होण्यास धोका निर्माण झाला आहे. हजारो रूपये किमतीचे बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. मात्र पावसाअभावी सदर पऱ्हे करपण्याचा धोका निर्माण झाला असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. (नगर प्रतिनिधी)
अनुदानावर बियाणे उपलब्ध करा
दुबार पेरणीचे संकट कोसळल्यास शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. बँकांकडून कर्ज काढून बियाणे खरेदी केले आहे व शेतीची मशागतही केली आहे. जवळचे पैसे आता खर्च झाले आहेत. त्यामुळे पुन्हा बियाणे खरेदी करण्यासाठी कुठून पैसे आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाने दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
रोवणी लांबणीवर जाणार
सध्या टाकलेले पऱ्हे करपल्यास शेतकऱ्यांना दुबार पऱ्हे टाकावे लागणार आहेत. सदर नवीन पऱ्हे तयार होण्यासाठी आणखी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. परिणामी धानाची रोवणी लांबून धानाच्या उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सिरोंचा तालुक्यात कापसाचे तर चामोर्शी तालुक्यात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी करतानाच रासायनिक खत टाकले जात असल्याने या दोन पिकाला पावसाची नितांत गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी पाणी देत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांसमोर पीक करपताना बघितल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नाही.
विसापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर डोमाजी देशमुख यांनी नागपूर येथील एका खासगी कंपनीच्या धान वाणाच्या तीन बॅगची खरेदी गडचिरोली शहरातील एका कृषी केंद्रातून केली. परंतु खरेदी केलेल्या धानाच्या बिजाईमध्ये २५ ते ३० टक्के लांबोर व खडधान असल्याचे आढळून आलले आहे. यावरून कृषी केंद्रातून धानाच्या बिजाई बॅगमध्ये सर्रास भेसळ करून विक्री होत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर भेसळयुक्त बियाणे निघाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. कंपनीने या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणी ज्ञानेश्वर देशमुख या शेतकऱ्याने केली आहे.