दराची गावात पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:00 AM2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:27+5:30

त्यामुळे नागरिकांना गावातील एका हातपंपावरच पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत होते. हातपंपामध्येही अनेकदा बिघाड यायचा. त्यामुळे नागरिकांनी येथे विहीर बांधकामाची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली असून आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत ठक्करबाप्पा योजनेतून विहीर खोदण्यात आली.

Water supply in the village at a rate | दराची गावात पाण्याची सोय

दराची गावात पाण्याची सोय

Next
ठळक मुद्देठक्करबाप्पा योजना : अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपल्याने उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दराची गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे नागरिकांना गावातील एका हातपंपावरच पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत होते. हातपंपामध्येही अनेकदा बिघाड यायचा. त्यामुळे नागरिकांनी येथे विहीर बांधकामाची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली असून आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत ठक्करबाप्पा योजनेतून विहीर खोदण्यात आली.
दराची व केरमऱ्यान गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे सरपंच निरंजना नरोटे यांनी प्रकल्प कार्यालयात विहिरीसाठी प्रस्ताव सादर केला. त्यामुळे ग्रा. पं. अंतर्गत दराची व केरमºयान गावासाठी दोन विहिरी मंजूर झाल्या. या विहिरींचे बांधकाम ठक्करबाप्पा योजनेतून करण्यात आले. त्यामुळे आता गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. नागरिकांनी प्रकल्प कार्यालयाचे आभार मानले असून मागील अनेक वर्षांपासून केल्या जाणाऱ्या त्यांच्या मागणीला यश आले आहे.

पाण्यासाठी होता नाल्याचा आधार
अतिदुर्गम दराची गाव अद्यापही शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित आहे. येथे केवळ एक हातपंप आहे. सदर हातपंपामध्ये अनेकदा बिघाड यायचा. त्यामुळे नागरिकांना गावालगतच्या नाल्यात लहान खड्डा खोदून वर्षभर पाणी प्यावे लागायचे. पावसाळ्यात नागरिकांना गढूळ पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असे. परंतु गावात शासकीय योजनेतून विहिरीचे बांधकाम न झाल्याने त्यांना कसेबसे दिवस काढावे लागत होते. मात्र आता विहिरीचे बांधकाम झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Water supply in the village at a rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.