शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांची प्रतीक्षा संपली

By admin | Updated: May 15, 2014 02:08 IST

ब्रह्मपुरी परिसरात मागील दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर केलेल्या ६00 शेतकर्‍यांच्या कृषीपंपाकरिता वीजजोडणी मिळणार आहे.

शेतकर्‍यांना दिलासा: लवकरच मिळणार वीज कनेक्शनब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी परिसरात मागील दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर केलेल्या ६00 शेतकर्‍यांच्या कृषीपंपाकरिता वीजजोडणी मिळणार आहे. याबाबत सादर झालेले अर्ज धूळखात असून वीजजोडणीअभावी शेतकर्‍यांना नुकसानीला सामोरे जावे लागत होते.निसर्गाच्या लहरीप्रमाणे पावसाचे प्रमाण असल्याने शेतकरी अडचणीत आला.विहिरीत पाणी असूनसूद्धा ते पिकाला देऊ शकत नाही. याला कारण म्हणजे कृषीपंपाला नसलेला वीजपुरवठा परिणामी उभे पीक डोळ्यांसमोर वाळत होते.शेतकर्‍यांचे अशी अवस्था असताना सुद्धा वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले होते. शेतकर्‍यांनी तथा आमदार अतुल देशकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून व्यथा शासनासमोर मांडल्या. दरम्यान शेतकर्‍यांच्या कृषीपंपाच्या वीजजोडणीकरिता शासनाकडून ४५0.४६ लाख रुपये मंजूर झाले आहे. यामुळे हे काम त्वरीत सुरू करावे व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी विनंती शेतकर्‍यांनी केली आहे.सदर काम आदित्य इलेक्ट्रिकल्स व पद्मावती इलेक्ट्रिकल्स यांना देण्यात आले असून ब्रह्मपुरी विभागात ३00 पंपांना, सिंदेवाही विभागत ९७, तर सावली तालुक्यातील ११४शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना मंजुरी मिळाली आहे. ज्यांनी नोव्हेंबर २0१३ पर्यंत अर्ज सादर केले. अशा शेतकर्‍यांना कृषीपंपाकरिता वीजखांब त्यावरील तार लावून वीजजोडणी मिळणार आहे. या वीजजोडणीकरिता ६३ केव्हीचे ४७ ट्रान्सफार्मर तर १00 केव्हीचे ९व २५ केव्हीचे ट्रान्सफार्मर लागणार असून कामाला लवकरच सुरूवात होऊन शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. शेतकर्‍यांच्या व्यथा समजून लगेच वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.मागील अनेक दिवसांपासूनची मागणी लवकरच पूर्ण होणार असून शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील शेतकर्‍यांना वीज पुरवठा त्वरित द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)