शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

गटार लाइनच्या कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:25 IST

गडचिरोली : शहरात भूमिगत गटार लाइनचे काम करताना करारात ठरविण्यात आलेल्या नियमांचे कंत्राटदाराकडून पालन केले जात नसल्याने नागरिकांना त्रास ...

गडचिरोली : शहरात भूमिगत गटार लाइनचे काम करताना करारात ठरविण्यात आलेल्या नियमांचे कंत्राटदाराकडून पालन केले जात नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका माधुरी खोब्रागडे यांनी केली आहे. गडचिरोली शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून भूमिगत गटार लाइनचे काम करण्यात येत आहे.

नगर परिषद प्रशासनाने कंत्राटदाराला कामाचे आदेश देताना नियम व अटी घालून दिल्या होत्या. कंत्राटदाराने काम करताना नियमांचे पालन करण्यात येईल याची हमी दिली होती. मात्र, सद्य:स्थितीत गटार लाइनचे काम करताना ठरवून दिलेल्या कोणत्याही नियमांचे पालन होत नसताना दिसून येत आहे.

रस्त्याचे खोदकाम नियमानुसार होत नाही. रस्ते खोदल्यानंतर चेंबर बनविताना रस्त्यापेक्षा कितीतरी उंच बनविण्यात आले आहेत. यामुळे रस्ते उंच होऊन नागरिकांची घरे खाली गेली आहेत. रस्ता खोदण्यात आल्यानंतर तो पूर्ववत करून दिला जाईल, अशी अट कंत्राटदाराने मान्य केली होती. मात्र, रस्ता खोदल्यानंतर योग्य रीतीने पूर्ववत केला जात नसल्याने शहरातील प्रत्येक वाॅर्डातील रस्त्यावर ठिकठिकाणी उंचवटे निर्माण होऊन त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना नेहमीच अपघाताची भीती सतावत असते. रस्त्याचे काम नियोजनानुसार केले जात नसल्याने अनेक भागांतील रस्त्यावरील वाहतूक बंद पडत असल्याने नागरिकांना दुसऱ्या मार्गाने जावे लागते. नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून नगरसेवकांनाही नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. नियोजनानुसार काम करीत नसल्याने त्याचे काम थांबविण्याची कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका माधुरी खोब्रागडे यांनी केली आहे.