समुदाय आरोग्य अधिकाऱ्याकडून होताहे करारनाम्याचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:49+5:30

सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मुख्यालयी राहून आरोग्य सेवा देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याशी सदर डॉक्टरांनी करारनामा केला आहे. या करारनाम्यातील नमूद वेळेत सदर डॉक्टर मुख्यालयी दांडी मारून खासगी व्यवसायात व्यस्त राहत असल्याचे दिसून येत आहे.

Violation of the agreement by the community health officer | समुदाय आरोग्य अधिकाऱ्याकडून होताहे करारनाम्याचे उल्लंघन

समुदाय आरोग्य अधिकाऱ्याकडून होताहे करारनाम्याचे उल्लंघन

Next
ठळक मुद्देमुख्यालयाला दांडी । ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवेवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमाअंतर्गत देसाईगंज तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रस्तरावर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या आरोग्य अधिकाऱ्याकडून गेल्या अनेक महिन्यांपासून करारनाम्याचा उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मुख्यालयी राहून आरोग्य सेवा देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याशी सदर डॉक्टरांनी करारनामा केला आहे. या करारनाम्यातील नमूद वेळेत सदर डॉक्टर मुख्यालयी दांडी मारून खासगी व्यवसायात व्यस्त राहत असल्याचे दिसून येत आहे.

आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमाअंतर्गत सद्य:स्थितीत राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये १ हजार २४३ उपकेंद्रस्तरावर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सन २०२२ पर्यंत परिपूर्ण आरोग्यसेवा जनतेला उपकेंद्रस्तरावर देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक ही आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक मुंबई यांच्या २८ मार्च २०२० च्या आदेशान्वये करण्यात आली आहे. त्यानुसार देसाईगंज तालुक्यात १० समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहे.
कोविड-१९ साथरोग परिस्थितीच्या धर्तीवर उपकेंद्रस्तरावर मनुष्यबळाची कमतरता लक्षात लक्षात घेता समुदाय आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात करण्यात आली. तालुक्यातील शंकरपूर, शिवराजपूर, कोकडी, तुळशी, बोडधा, विसोरा, आमगाव, कोंढाळा, पोटेगाव व किन्हाळा या १० आरोग्य उपकेंद्रात १० समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. उपकेंद्रात अनेक रुग्ण उपचारासाठी येतात.

करारनाम्यात १६ अटी, शर्तींचा समावेश
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जि.प.गडचिरोलीच्या वतीने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश देताना १६ अटी व शर्ती असलेला करारनामा लिहून देण्यात आला आहे. यामध्ये ७ क्रमांकाच्या अटीनुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत नियुक्ती ठिकाणी आरोग्य सेवा देण्याचा उल्लेख आहे.

तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी मुख्यालयी राहत नसतील तर चौकशी केली जाईल. चौकशीदरम्यान मुख्यालयी न राहत असल्याचे आढळून आल्यास संबंधित समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- डॉ.अभिषेक कुमरे,
तालुका आरोग्य अधिकारी, देसाईगंज

Web Title: Violation of the agreement by the community health officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर